Pune Porsche Accident Saam Tv
Video

Pune Porsche Accident: पोर्शे कार अपघात प्रकरण, जेलवारी करूनही अग्रवाल कुटुंबीयांचा माज उतरला नाही; धक्कादायक VIDEO चर्चेत

Pune Porsche Accident Accused Video: पुण्यातील पोर्शे कार अपघातातील आरोपींचा व्हिडीओ समोर आला आहे. जेलमधून जामीनावर बाहेर येताच आरोपींनी जंगी पार्ट केली. या पार्टीतला व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवाल जामिनावर बाहेर येताच जंगी पार्टी करण्यात आली. या पार्टीतील व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अग्रवाल पती-पत्नी गळ्यात नोटांचे हार घालून 'मुंबई से आया मेरा दोस्त' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. महिन्याभरापूर्वीच विशाल अग्रवालची सुटका झाली. जेलवारीनंतरही अग्रवाल कुटुंबाचा हा माज कायम असल्याचं दिसत आहे.

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये १९ मे २०२४ रोजी पोर्शे कार अपघाताची घटना घडली होती. १७ वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत भरधाव कार चालवत दोन जणांना चिरडले होते. या अपघातामध्ये इंजिनिअर तरुण अनीश अवधिया आणि तरुणी अश्निनी कोष्टा या दोघांचा मृत्यू झाला होता. या अपघाताप्रकरणी अग्रवाल कुटुंबीयांविरोधात कारवाई करण्यात आली होती. संपूर्ण कुटुंब जेलमध्ये गेले होते. २२ महिन्यांनंतर या प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालला जामीन मिळाला. जामीन मिळाल्यानंतर त्याने जंगी पार्टी केली या पार्टीतील व्हिडीओ समोर आल्याने अग्रवाल कुटुंबीय पुन्हा चर्चेत आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT