CCTV footage shows the accused engineering student stealing jewellery from a Pune shop. Saam Tv
Video

Pune News: कॉलेज टॉपरकडून 5 लाखांच्या सोन्याची चोरी; घटना CCTV मध्ये कैद, पाहा, VIDEO

Pune CCTV Footage Jewellery Robbery: पुण्यातील एका ज्वेलरी दुकानातून १ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या कर्नाटकातील १९ वर्षीय इंजिनिअर विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली.

Omkar Sonawane

पुणे: येथील बाजीराव रोड, नु.म.वि. शाळेशेजारी, पुणे-०२ असे १ ग्रॅम ज्वेलरी (फॉर्मिंग ज्वेलरी) चे दुकानातून आरोपीने दुकानातील एकुण किंमत ४ लाख ७४ हजार रुपये रुपये किमतीचा एक ग्रॅम सोन्याची (फॉर्मिंग ज्वेलरी) चा माल चोरुन नेला याबाबत विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्याचे तपास करताना २३० ते २५० सीसीटीव्ही कॅमेरे चेक करुन संशयीत हा जंगमगुर्जनहल्ली पोस्ट अरनहल्ली कोलार राज्य कर्नाटक येथील असल्याचे स्पष्ट झाल्याने आरोपीला विश्रामबाग पोलिसांनी कोलार जिल्हयात जावुन लोकल पोलिसांच्या मदत घेवुन राहते घरी जावुन शोध घेतला असता आरोपी आल्याने त्याच्या राहत्या घरची घर झडती घेतली असता चोरी करणार आरोपीने यांने पायात परिधान केलेला सॅण्डल, बॅग (सॅक) तसेच इंजिनिअरिंगचे कॉलेजचे आयकार्ड, व मोबाईल मिळुन आल्याने सदर मोबाईल चेक केला असता मोबाईल मध्ये १ ग्रॅम सोन्याचे फोटो व आरोपीच्या हाताच्या जखमेचे फोटो मिळुन आल्याने व सदरच्या वस्तु सीसीटीव्ही मधील हुबेहुब दिसुन आल्याने सदरचा गुन्हा आरोपी लिखीत जी वय १९ वर्षे रा. जंगमगुर्जनहल्ली, पो. अरनहल्ली ता. जि. कोलार राज्य कर्नाटक याने केल्याचे निष्पन्न झाले.

आरोपी मिळुन न आल्याने ४ दिवस आरोपी ज्या ज्या ठिकाणी येतो त्या त्या ठिकाणी लोकल पोलीसांची मदत घेऊन ट्रॅप लावुन आरोपीस गांधीनगर, कोलार, राज्य कर्नाटक येथुन ताब्यात घेवुन संशयाताकडुन गुन्हयातील गेलेला माल १ ग्रॅम सोन्याचे वेगवेगळे दागिन्यांची किंमत ४लाख ७४ हजार रुपायांचा शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या आरोपीने अजून कुठे असे गुन्हे केले आहेत का याचा तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: श्रावणात त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना कुठलीही बॅग, पिशवी, बाटली नेण्यास बंदी

Latur Band : छावाच्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादीच्या नेत्याची बेदम मारहाण, राज्यात पडसाद, आज लातूर बंद

Horoscope Monday Update: कामिका एकादशीचे व्रत फलदायी ठरेल, प्रगतीची आस राहील; आजचे राशीभविष्य

Morning Breakfast Recipe : व्यायामानंतर भरपूर भूक लागते? फक्त ५ मिनिटांत बनवा 'हा' पौष्टिक नाश्ता

Amitabh Bachchan : व्हिडीओ काढणाऱ्या पापाराझींवर अमिताभ बच्चन भडकले, नेमकं घडलं काय?

SCROLL FOR NEXT