MPG Club Hotel, previously sealed in Porsche car accident case, now back in Agrawal family’s possession amid controversy. Saam Tv
Video

पोर्शे कार अपघात प्रकरणात ट्विस्ट; अग्रवाल कुटुंबाला सील केलेले MPG Club हॉटेल पुन्हा ताब्यात|VIDEO

Porsche Car Accident Case: पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर MPG Club हॉटेल सील करण्यात आले होते. सुमारे एक वर्षानंतर सातारा प्रशासनाच्या गुप्त आदेशानंतर हे हॉटेल पुन्हा अग्रवाल कुटुंबाच्या ताब्यात आले आहे.

Omkar Sonawane

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील विशाल अग्रवाल यांचे महाबळेश्वर कनेक्शन समोर आल्यानंतर त्यांचं MPG club हे पंचतारांकित हॉटेल महाबळेश्वर मध्ये अनाधिकृत पद्धतीने उभ असल्याचं समोर आलं होतं.यानंतर खडबडून जागं होत प्रशासनाने कारवाई केली होती. शासकीय मिळकतीमध्ये तीस वर्षाच्या भाडेपट्ट्यानं रहिवास वापराकरता घेतलेल्या जागेमध्ये पांचतारंकित उभ असलेलं हे MPG club हॉटेल सील करत अनधिकृत पद्धतीने केलेलं बांधकाम पाडून या हॉटेलमधला बार सुद्धा सील केला होता.

याला जवळपास एक वर्ष उलटून गेल आहे. मात्र सातारा जिल्हा प्रशासनान अगदी गुप्त पद्धतीने आदेश काढत हे हॉटेल पुन्हा अग्रवाल कुटुंबाच्या ताब्यात दिल आहे. शासकीय मिळकतीमध्ये भाडेपट्ट्याने असलेली या अग्रवाल कुटुंबाची जागा पुन्हा शासनाने माघारी घ्यावी अशी मागणी तेव्हापासून होत होती सर्व नियम धाब्यावर बसवून प्रशासनाची फसवणूक करत उभारलेल्या या हॉटेलचं सील काढून ते पुन्हा अग्रवाल कुटुंबालाच का देण्यात आलं याबाबत उलट सुलट चर्चा सध्या सुरू झालेली आहे.मोठा राजकीय दबाव जिल्हा प्रशासनावर होता असं सुद्धा बोलले जातंय.जर राजकीय दबाव होता तर कोणत्या नेत्याचा होता हे सुद्धा समोर यावं असं लोकांचं म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update :मुंबईचे डबेवाले आजपासून सहा दिवस सुटीवर

लिव्ह-इन रिलेशनशिपमधील जोडप्यांना नवरा-बायको समजलं जाणार? जनगणनेच्या नव्या नियमामुळे चर्चांना उधाण

Heart attack: हार्ट अटॅकपूर्वी दिसणाऱ्या या ५ लक्षणांकडे महिला करतात हमखास दुर्लक्ष; शरीरात होणारे बदल ओळखा

Gold Rate Today: खुशखबर! सराफा बाजार उघडताच सोनं झालं स्वस्त; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Phone Charging Tips : चार्जर नाही, तर काय झाले; 'या' स्मार्ट ट्रिक्स वापरून मिनिटांत मोबाईल फोनची बॅटरी होईल फुल

SCROLL FOR NEXT