Laxman Hake: न्यायालय सरकारला योग्य ती जागा दाखवेल; सातारा, औंध गॅझेट लागू करण्यावरून लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल

Laxman Hake Attacks Government: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. सातारा आणि औंध गॅझेट सरकारच्या अंगलट येईल असा इशारा दिला. एसईबीसी आरक्षणावरील उच्च न्यायालयाच्या सुनावणीमुळे कुणबी प्रमाणपत्रांवरून नवीन वाद निर्माण झालाय.
Laxman Hake Attacks Government
Laxman Hake attacks government: Satara-Aundh Gazette will backfire, OBC reservation under threatsaam tv
Published On
Summary
  • लक्ष्मण हाके यांनी सरकारवर सातारा-औंध गॅझेटवरून हल्लाबोल केला.

  • कुणबीकरणाद्वारे ओबीसी आरक्षण संपवलं जात असल्याचा आरोप.

  • उच्च न्यायालयातील आरक्षणावरील पुढील सुनावणी ४ ऑक्टोबरला.

सातारा आणि औंध गॅझेट लागू केल्यास सरकार तोंडघशी पडेल. न्यायालय सरकारला योग्य ती जागा दाखवेल. एकाच जातीला अनेक प्रकारचे आरक्षण देता येत नाही, अशा शब्दात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सरकारवर टीका केली. मुंबईत उच्च न्यायलयात आरक्षणावर सुनावणी होतेय. आज एसीबीसी आरक्षणाविरुद्धात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. पुढील सुनावणी ४ ऑक्टोबरला होणार आहे, त्यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सरकारवर टीका केलीय.

Laxman Hake Attacks Government
Maratha SEBC Reservation: शैक्षणिक मागासलेपणाचा युक्तिवाद पूर्ण, आता सामाजिक-आर्थिक मुद्द्यांवर सुनावणी होणार

कुणबीकरणाद्वारे ओबीसीमध्ये घुसण्याचा डाव सरकारने, मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी आखलाय. हा डाव त्यांच्याच अंगलट येईल. यापुढे मतदान करताना ओबीसींना वेगळा विचार करावा लागेल. ओबीसीचे आरक्षण या सरकारने घालवलं आहे. सरसकट कुणबी प्रमाणपत्र काढण्यात येणे म्हणजे ओबीसींचा आरक्षण संपलंय. कुणबी करणाद्वारे ओबीसींचे आरक्षण संपवले जातंय. मराठ्यांचा मागासलेपणा न्यायालय आणि आयोगाने वेळोवेळी नाकारल्याचं लक्ष्मण हाके म्हणालेत.

Laxman Hake Attacks Government
Maratha Reservation: १० टक्के की OBC, मराठा समाजाला कोणतं आरक्षण देणार? उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल

सरकारवर हल्लाबोल करताना हाकेंनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरही टीका केली. मनोज जरांगे यांनी बीड शहर पेटवलं. मुंबई वेठीस धरली. त्यांनी जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची आई-माय काढली. त्यावेळी बीड जिल्ह्यातले वातावरण दूषित नव्हतं का? त्यांचा जाच सहन करायचा. पण ओबीसीने काहीच बोलायचं नाही. ओबीसीने बोललं की, वातावरण दूषित होतं म्हणजे हे आमच्या बाबतीत होते, असे हाके म्हणालेत.

आम्ही मोर्चा काढल्यामुळे गेवराई आणि बारामतीत आमच्यावर गुन्हे दाखल झालेत. हा सामाजिक दुजाभाव आहे. जरांगे मात्र लाखो माणसं मुंबईत घेऊन गेले. त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही, अशी टीका देखील त्यांनी केली. सरकारने सातारा आणि औंध गॅझेट लागू केलं तर ते तोंडघशी पडतील. न्यायालय त्यांना योग्य ती जागा दाखवेल,” असे म्हणत हाके यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल चढवला. दसरा झाल्यानंतर ओबीसींची संघर्ष यात्रा सुरू होईल आणि त्याचा समारोप मुंबईत होणार आहे , त्यावेळी आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत जाऊ,” अशी घोषणा लक्ष्मण हाके यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com