OBC Morcha SAAM TV
Video

Mumbai : मराठा समाजाच्या आंदोलनानंतर आता मुंबईत ओबीसींचा महामोर्चा | VIDEO

OBC Morcha : मराठा समाजाच्या आंदोलनानंतर आता ओबीसी समाजाचाही मुंबईत महामोर्चा निघणार आहे. दसऱ्यानंतर हा मोर्चा निघण्याची शक्यता आहे. ८ किंवा ९ ऑक्टोबरला हा मोर्चा निघू शकतो, असं बोललं जात आहे. आज होणाऱ्या ऑनलाइन बैठकीत याबाबत अंतिम निर्णय होईल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठा समाजाच्या आंदोलनानंतर आता ओबीसी समाजही आंदोलनाच्या तयारीला लागला आहे. ओबीसी संघटनांकडून मुंबईत महामोर्चाचे आयोजन करण्यात येणार असून, हा मोर्चा दसऱ्यानंतर काढला जाणार आहे. प्राथमिक चर्चेनुसार ८ किंवा ९ ऑक्टोबर रोजी हा मोर्चा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याबाबतची अंतिम तारीख आज होणाऱ्या ऑनलाइन बैठकीत निश्चित होणार आहे. या बैठकीत विविध ओबीसी संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार असून, मंत्री छगन भुजबळ यांचीही उपस्थिती राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील आरक्षण आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याने पुन्हा एकदा मुंबईत मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची चिन्हे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खेड पंचायत समिती निवडणुकीतील शिवसेना पक्षाच्या इच्छुक उमेदवाराच्या घरासमोर जादूटोणा

Crime: मित्राच्या ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, सोबत दारू प्यायले; नंतर चिमुकलीला खेळायला बाहेर घेऊन गेला अन्...

Homemade Rose Water: हिवाळ्यात ताज्या गुलाबांपासून घरीच बनवा गुलाबजल; तुमच्या त्वचेला मिळेल नॅचरल ग्लो आणि सॉफ्टनेस

TET पेपर फोडण्याचा प्रयत्न, 9 जणांच्या टोळीला अटक

Shocking : आत्याच्या घरी सुरु होती लगीन घाई, कुटुंबीयांची नजर चुकवून १३ वर्षीय तरुणीने केली आत्महत्या, धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT