पावसाळी पर्यटनासाठी निघालेल्या पर्यटकाचा अतिधाडस जीवावर बेतल्याची दुर्दैवी घटना रायगड जिल्ह्यात घडली आहे. मुंबईतील ऋषी पथीपका (वय २२) हा तरुण रायगडच्या माणगाव तालुक्यातील चन्नाट येथील धबधब्यावर मित्रांसह मौजमजेसाठी गेला होता. मात्र, धबधब्याखाली पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.घटनेनंतर घटनास्थळी एकच हाहाकार उडाला. मित्रांनी मदतीचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत उशीर झाला होता.
स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांनी शोधमोहीम राबवून मृतदेह बाहेर काढला आहे. विशेष म्हणजे, ऋषी पथीपकाचा धबधब्यात उडी मारतानाचा थरारक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर पावसाळी पर्यटनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.प्रशासनाकडून पर्यटकांना सावधगिरी बाळगण्याचं आणि जलप्रवाहाच्या ठिकाणी अतिधाडसी कृत्य टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.