mumbai rain  Saam tv
Video

Mumbai Rain: मुंबईकरांसाठी पुढचे काही तास महत्वाचे, पावसाची जोरदार बॅटिंग, यलो अलर्ट| VIDEO

IMD Alert For Mumbai: मुंबईमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. बुधवारी रात्रीपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. आजही मुंबईला हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे.

Priya More

मुंबईत रात्रीपासून जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईसह उपनगरांमध्येही पावसाची संततधार सुरूच आहे. या पावसाचा फटका मुंबईकरांना बसत आहे. पावसामुळे मुंबईतील रस्त्यावर पाणी साचायला सुरूवात झाली आहे. सध्या तरी रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही.हवामान खात्यानं मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी पुढचे काही तास खूपच महत्वाचे आहेत.

मेघगर्जनेसह आणि वेगवान वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पुढील काही तासामध्ये मुंबईसह कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचना लक्षात घेऊन काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईकरांनी घराबाहेर पडताना सतर्क राहण्याचे देखील आवाहन केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT