FDA officials inspect Flipkart Minutes warehouse in Badlapur after a customer complaint about a moldy pizza base. saam tv
Video

बुरशी लागलेला पिज्झा बेस दिला अन् काहीवेळातच FDA चे अधिकारी धडकले|VIDEO

Flipkart Minutes Moldy Pizza Base Complaint Badlapur FDA Action: बदलापूरमध्ये ग्राहकाला बुरशी लागलेला पिज्झा बेस दिल्याच्या तक्रारीनंतर FDAने फ्लिपकार्ट मिनिट्सच्या गोडावूनवर छापा टाकत मोठी कारवाई केली. या प्रकरणात संबंधित शाखेचा परवाना निलंबित करण्यात आला असून अन्न सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Mayuresh Kadav

बदलापुरात FDAनं मोठी कारवाई केली. ग्राहाला बुरशी लागलेला पिज्झा बेस दिल्याप्रकरणी राऊत चौकातील फ्लिपकार्ट मिनिट्सचा परवाना निलंबित करण्यात आला असून ग्राहकांच्या तक्रारीनंतर या प्रकरणात मनसेनं आवाज उठवला होता. त्यानंतर FDAच्या अधिकाऱ्यांनी काल संध्याकाळी फ्लिपकार्ट मिनिट्सच्या गोडावूनवर छापा मारत सर्व खाद्यपदार्थांची तपासणी केली. काल संध्याकाळपासून सुरू झालेली ही कारवाई आज दुपारपर्यंत सुरू होती. या कारवाईदरम्यान याठिकाणी FDA अधिकाऱ्यांना काही डर्टी खाद्यपदार्थ आढळून आले. त्यानंतर या फ्लिपकार्ट मिनिट्स ब्रांचचा परवाना निलंबित करण्यात आला. तर जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा कंपन्यांवर कायमस्वरूपी कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: मोदी सरकार बेरोजगारांना २,५०० रुपये देणार? काय आहे केंद्राच्या योजनेचं सत्य?

वयाची तिशी गाठलेल्यांनाही होतोय डायबिटीज; 'ही' 5 लक्षणं दिसताच करा चेकअप

Made in Pakistan Cosmetics: पाकच्या सौंदर्यप्रसाधनांचा राज्यात सुळसुळाट; ‘गोरी ब्युटी क्रीम’चं संगमनेर कनेक्शन

Pakistan Blast: शांतता रॅलीदरम्यान मोठा स्फोट; ७ जण ठार, १८ जखमी

'सर्वच क्षेत्रात वजन कमी, येणारा काळ आपलाच, आम्हाला बोलता न येणारी खाती मिळाली, मुंडे भाऊ-बहिणीच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT