Ambarnath Municipal Council Political Rift Saam Tv
Video

Maharashtra Politics: अंबरनाथमध्ये राजकारण तापले, नगरपालिकेबाहेर भाजप-शिंदेसेनेचे कार्यकर्ते भिडले, पाहा VIDEO

Ambarnath Municipal Council Political Rift: अंबरनाथमध्ये भाजप आणि शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमुळे तुफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते भिडले. याचा व्हिडिओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

Priya More

अंबरनाथमध्ये राजकीय वातावरण तापले. अंबरनाथमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये नगरपरिषदेबाहेर तुफान राडा झाला. नगरपालिकेबाहेर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आपापसात भिडले. काल उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर पालिकेबाहेर भाजप आणि शिंदेसेनेचे कार्यकर्ते भिडले. पालिकेबाहेर झालेल्या राड्याचे व्हिडिओ समोर आले असून ते व्हायरल होत आहेत. उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपचा पराभव केला होता.

अंबरनाथमध्ये भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला. त्यानंतर उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे गट आणि अजित पवार गटाने बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सदा मामा पाटील यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली. भाजप प्रणित अंबरनाथ विकास आघाडीला २८ मते मिळाली. तर अंबरनाथ शिवसेना महायुती विकास आघाडीला एकूण ३२ मते मिळाली होती. उपनगराध्यत्रपदी सदा मामा पाटील यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nath Designs: पारंपारिक मोत्याची नथ ते ऑक्सिडाईज्ड नथ, संक्रांतीनिमित्त या आहेत 5 लेटेस्ट नथ डिझाईन्स

Fresh Coconut Tips: फोडलेला नारळ रात्रीतच खराब होतो? मग 'ही' ट्रिक वापरा, खोबरं राहील फ्रेश

Maharashtra Live News Update : शहादा नगरपालिकेसाठी भाजपाच्या माधुरी मकरंद पाटील यांची उपनगराध्यक्षपदी वर्णी

राज्यात मोठी खळबळ! तब्बल 70 टक्क्यांहून अधिक मंत्र्यांचा गेम होणार? कुणाला मिळणार संधी?

Ravindra Chavan : मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी आधी इतिहासात डोकवावं, रवींद्र चव्हाणांचा घणाघात

SCROLL FOR NEXT