Gokul Election Saam Tv
Video

Gokul Milk News : बिगुल वाजलं! कोल्हापुरात 'गोकुळ'मध्ये धुरळा; निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर

Kolhapur Gokul Dudh Sangh Election: कोल्हापूरच्या प्रतिष्ठेच्या गोकुळ दूध संघ निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. २ जूनपासून ठराव संकलन प्रक्रिया सुरू होणार असून जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Namdeo Kumbhar

Gokul Election Date Update : कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात प्रतिष्ठेची मानली जाणारी गोकुळ दूध संघ निवडणूक अखेर मार्गी लागली असून निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. दोन जूनपासून ठराव संकलन प्रक्रियेला सुरुवात होणार असून एक जुलै २०२६ पर्यंत ठराव दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाभरात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून न्यायालयीन प्रक्रिया आणि मतदार याद्यांवरील वादामुळे निवडणूक प्रक्रिया रखडली होती. मात्र आता पुन्हा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून दोन जूनपासून संस्थांकडून ठराव संकलनाची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर एक जुलै २०२६ ही ठराव दाखल करण्याची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर आता गोकुळच्या सत्तेसाठी राजकीय गटांमध्ये मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील दूध संस्थांमध्ये बैठका, संपर्क दौरे आणि रणनीती आखण्यास सुरुवात झाली असून ठरावांच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे. गोकुळच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT