Women engaged in a heated clash in Kalyan’s Pisavali area as the incident was captured on video and later went viral on social media Saam Tv
Video

कल्याणमध्ये महिलांचा राडा; मारहाणीचा VIDEO व्हायरल

Women Fight Viral Video In Kalyan Pisavali Area: कल्याणच्या पिसवली परिसरात क्षुल्लक कारणावरून महिलांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Omkar Sonawane

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण शहरातील पिसवली परिसरात क्षुल्लक कारणावरून महिलांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ वादातून दोन गटांतील महिलांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. काही क्षणांतच वाद चिघळत गेला आणि एका महिलेला इतर महिलांनी मारहाण केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. परिसरातील काही नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र परिस्थिती काही काळ तणावपूर्ण बनली होती.

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेत तपास सुरू केला आहे. संबंधित महिलांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, चौकशीनंतर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

Chanakya Niti: हुशार लोक या 6 ठिकाणी धाडस दाखवत नाहीत; खड्ड्यात पडण्यापासून व्हा सावध, वाचा चाणक्यांचा सल्ला

Viral Video: लिफ्टमध्ये अडकली होती २ मुलं, धाडस दाखवत मुलीने वाचवले प्राण, व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

Upit Recipe: संध्याकाळी भूक लागल्यावर झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी उपीट, वाचा सोपी रेसिपी

How to Keep Kobi Fresh: कोबी आठवडाभर राहील ताजी, वापरा फक्त ही १ ट्रीक

SCROLL FOR NEXT