Jubin Nautiyal : ना शाही सोहळा, ना कोणता थाट... प्रसिद्ध गायकाने गुपचूप लग्न उरकलं, बालपणीच्या मैत्रिणीसोबत बांधली लग्नगाठ

Jubin Nautiyal Marriage : बॉलिवूड गायक जुबिन नौटियालने आपल्या बालमैत्रिणीशी विवाह केला आहे. त्याच्या लग्नाचे खास क्षण सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.
Jubin Nautiyal : ना शाही सोहळा, ना कोणता थाट... प्रसिद्ध गायकाने गुपचूप लग्न उरकलं, बालपणीच्या मैत्रिणीसोबत बांधली लग्नगाठ
Jubin Nautiyal MarriageSaam Tv
Published On
Summary
  • गायक जुबिन नौटियाल लग्नबंधनात अडकला

  • डेहराडूनमध्ये साध्या पद्धतीने विवाह

  • बालमैत्रिणीशी केला विवाह

  • सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर

बॉलिवूडचा लोकप्रिय पार्श्वगायक जुबिन नौटियालने आपल्या लाखो चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. 'रातां लंबियां' आणि 'लुट गए' सारख्या सुपरहिट गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा जुबिन लग्नबंधनात अडकला आहे. जुबिनने उत्तराखंडमधील आपल्या मूळ गावी निसर्गरम्य वातावरणात बालपणीच्या मैत्रिणीशी लग्न केले आहे.

Jubin Nautiyal : ना शाही सोहळा, ना कोणता थाट... प्रसिद्ध गायकाने गुपचूप लग्न उरकलं, बालपणीच्या मैत्रिणीसोबत बांधली लग्नगाठ
Political News : महायुती सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी,मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं विरोधकांना भावनिक आवाहन

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, प्रसिद्ध गायक जुबिन नौटियालने उत्तराखंडमधील होमटाउन म्हणजेच डेहराडूनची निवड केली. जुबिनला त्याचे आयुष्य खासगी ठेवायला आवडते. त्यामुळे जुबिनने लग्नसोहळा अगदी साधा आणि खाजगी ठेवला होता. त्याला मोठे, आलिशान लग्न नको होते आणि त्याला त्याचा हा खास दिवस फक्त त्याच्या जवळच्या नातेवाईकांसोबत साजरा करायचा होता.

जुबिन नौटियालने काही खास क्षण सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. जुबिन नौटियालने २०१४ मध्ये 'सोनाली केबल' चित्रपटातील 'एक मुलाकात' या गाण्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्याने आजपर्यंत २०० हून अधिक गाणी गायली आहेत.

Jubin Nautiyal : ना शाही सोहळा, ना कोणता थाट... प्रसिद्ध गायकाने गुपचूप लग्न उरकलं, बालपणीच्या मैत्रिणीसोबत बांधली लग्नगाठ
Political News : ऐन निवडणुकीच्या काळात बड्या नेत्यानं सोडली भाजपची साथ; तृणमूल काँग्रेसमध्ये केला प्रवेश

उत्तराखंडमधील डेहराडूनचा रहिवासी असलेल्या जुबिनने २०११ मध्ये 'एक्स फॅक्टर' या गायन रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला होता, ज्यामुळे त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान'मधील 'कुछ तो बता जिंदगी' आणि हृतिक रोशनच्या 'काबिल'मधील 'काबिल हूँ क्या' या गाण्यांनी त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. ही गाणी लोकप्रिय झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com