म्हाडाला मोठा दिलासा! घरे विक्रीतून म्हाडाच्या तिजोरीत इतक्या कोटींचा महसूल जमा

mhada news : म्हाडाला मोठा दिलासा मिळालाय. घरे विक्रीतून म्हाडाच्या तिजोरीत कोटींचा महसूल जमा झाला आहे.
MHADA Lottery
MHADA LotterySaam Tv
Published On
Summary

विरार-बोळींजमधील धुळखात पडलेल्या घरांची अखेर विक्री

म्हाडाला घरे विक्रीतून म्हाडाच्या तिजोरीत 1300 कोटींचा महसूल जमा

संजय गडदे, साम टीव्ही

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार-बोळींजमधील दीर्घकाळ विक्रीविना पडून असलेल्या घरांना अखेर प्रतिसाद मिळू लागलाय. एकूण ९,४०९ घरांपैकी तब्बल ७,७६१ घरांची विक्री करण्यात मंडळाला यश आलं आहे. या विक्रीतून सुमारे १,३०० कोटी रुपयांचा महसूल म्हाडाच्या तिजोरीत जमा झालाय.

पाणी आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे या घरांना सुरुवातीला प्रतिसाद मिळत नव्हता. परिणामी हजारो घरे वर्षानुवर्षे धूळ खात पडून होती आणि म्हाडाचा मोठा निधी अडकून पडला होता. मात्र कोकण मंडळाने विविध उपाययोजना राबवत विक्रीला गती दिली. यामध्ये ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजना, सवलती, तसेच रेल्वे स्थानक आणि बाजारपेठांमध्ये जनजागृती मोहीम राबवण्यात आली. खासगी एजन्सींचीही मदत घेण्यात आली. या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून सध्या केवळ १,६५८ घरे विक्रीसाठी शिल्लक आहेत. उर्वरित घरांची विक्रीही लवकर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

MHADA Lottery
गुड न्यूज! ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो कधी सुरू होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

“वर्षानुवर्षे विक्रीविना पडून असलेल्या घरांमुळे मोठा निधी अडकला होता. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या विविध उपाययोजना आणि जनजागृतीमुळे गेल्या काही महिन्यांत विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला. उर्वरित घरांची विक्रीही लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया म्हाडा कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ विशाल राठोड यांनी दिली आहे.

MHADA Lottery
Maharashtra Live News Update: गॅस सिलेंडर तुटवड्याचा पहिला बळी; नियोजनाच्या अभावावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संताप

तत्पूर्वी, सध्या या घरांच्या खरेदीदारांना म्हाडाकडून कागदपत्रे पडताळून घेण्याची संधी देण्यात आली असून मुंबई म्हाडा मुख्यालयात विशेष सोय करण्यात आली आहे. घर खरेदीदारांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून डॉक्टर विशाल राठोड मुख्याधिकारी कोकण मंडळ यांनी कागदपत्र पडताळणी करण्यासाठी विशेष टीम देखील नियुक्त केली असून आलेल्या प्रत्येक घर खरेदीदाराला या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com