

अकोल्यात 13 लाख 80 हजार किमतीचं ड्रग्ज'चं जप्त. अकोला पोलिसांची मोठी कारवाई.
आता महाराष्ट्रात देखील “झॉम्बी ड्रग्ज” संदर्भात धक्कादायक प्रकरणे येतायेत उजेडात. या पार्श्वभूमीवर राज्याभरात नागरिकांमध्ये भीतीचे पसरले वातावरण. अशातच अकोल्यात 'ड्रग्ज'ची पहिली मोठी कारवाई. अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने 68.43 ग्रॅम 'ड्रग्ज'चं केलं जप्त. ज्याची किंमत 13 लाख 80 हजार इतकी. अकोल्यातीलं सिव्हिल लाईन हद्दीतील नविन बस स्थानकाच्या पाठीमागे एक व्यक्ती आला होता 'ड्रग्ज' विक्रीसाठी. मोहम्मद शफीक मोहम्मद जहिर शेख असं या व्यक्तीच नाव. तो मुळ ठाणे जिल्ह्यातील रहिवासी. त्याला ताब्यात घेत 68.43 ग्रॅम 'ड्रग्ज' जप्त. एकत्रित 13 लाख 80 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त. 'ड्रग्ज' विक्रीसंदर्भातील आतापर्यंत अकोला पोलिसांची सर्वात मोठी कारवाई. 'ड्रग्ज' विक्रीसंदर्भातील मुख्य टोळीचा अकोला पोलिसांकडून होणार लवकर फर्दाफाश.
डफळापूर-सांगली रोडवरील भारत पेट्रोलियम पंपाजवळ भीषण अपघात होऊन दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात शिरीष नामदेव जाधव यांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील पडेगाव येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकावरून निर्माण झालेला वाद अखेर प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर शांत झाला आहे. काही महिन्यांपूर्वी मंदिरासमोर उभारण्यात आलेल्या पुतळ्यावरून दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलीस प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत स्मारकावर पडदा टाकत कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता.
- विजेचा शॉक लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू...
- साकोरा येथील दुर्दैवी घटना..
- पांझण नदीवरील वीजपंप दुरुस्ती करतेवेळी घडली घटना...
- शिरीष भगवान पठाडे ( वय - ४२) व जगदिश तुकाराम खैरनार अशी मयत शेतकऱ्यांची नावे..
वसईच्या भुईगाव समुद्र किनारी मुलांना खिडकीत उभे करून महिला कारचालकाचा थरारक स्टंट केलाय.
आज सायंकाळी 5 वाजताची ही घटना आहे. या व्हिडीओ मध्ये एक महिला कार चालक, आपल्या मुलांना दारांच्या खिडकीत उभा करून, भारदाव वेगात कार चालवून स्टंट करताना दिसत आहे.
एका जागरूक नागरिकाने या कारचा व्हिडीओ काडून समाज माध्यमावर व्हायरल केला आहे. जर समुद्राला भरती असती, कार वाळूत फसली असती तर भीषण अपघात घडून जीवितहानी झाली असती
शिरूर पोलीस ठाण्याच्या आवारातच पोलीसांसमोरच दोन गट आमनेसामने येत दगडफेक आणि मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.
४० ते ५० जणांवर गुन्हा
या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिकेचे बदलून गेलेले आयुक्त १२ दिवसातच पुन्हा शहरातच आले.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त राहिलेले जी श्रीकांत यांची अवघ्या बारा दिवसात पुन्हा छत्रपती संभाजीनगरमध्येच बदली झाली आहे.
3 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेचे आयुक्त पदावरून त्यांची अभियान संचालक जलजीवन मिशन या मुंबई या ठिकाणी बदली झाली होती.
आता ते पुन्हा छत्रपती संभाजीनगरात बदली होऊन मराठवाड्याचे विभागीय आयुक्त म्हणून रुजू होणार आहेत.
अकोल्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का
शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख 'अश्विन नवले' यांनी आज आपल्या सर्व पदाचा राजीनामा दिला
पक्षातीलच माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या त्रासाला कंटाळून राजीनामा देत असल्याचं त्यांनी पत्रात नमूद केले.
अकोला जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळं शैक्षणिक संस्थांच्या वेळांमध्ये बदल.
आता अकोल्यात सकाळी 11 वाजेपर्यंत राहणार शाळा सुरू.
प्राथमिक शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांनी असे, आदेश दिले. उ
ष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची गंभीर दखल घेत शैक्षणिक संस्थांच्या वेळांमध्ये तातडीने बदल करण्याची सूचना बजावल्या. सर्व शाळा सकाळी 11 वाजेपर्यंत भरविण्यात याव्या.
जालन्यातील मोतीराम अग्रवाल मर्चंड कोऑपरेटिव्ह बँकेत 177 जणांच्या नावाने तब्बल 23 कोटी 23 लक्ष रुपयाचे बनावट कर्ज काढून बँकेची फसणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. वेअर हाउस मध्ये अस्तित्वात नसलेल्या माल दाखवून आरोपीने 177 जणांच्या नावावर हे कर्ज घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.
कल्याणमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून संतप्त झालेल्या पित्याने आपल्या अडीच वर्षांच्या चिमुकलीची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सुदैवाने आईच्या सतर्कतेमुळे मुलीचा जीव वाचला असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.
कारागृहातील इतर कैद्यांकडून शफी शेख याला मारहाण झाली आहे. सुनावणी दरम्यान स्वतः शफी शेख याने दिली माहिती आहे.
सेवाग्राम एक्सप्रेसला सेवाग्राम स्टेशनवर थांबा नसल्याची खासदारांची खंत आहे. दुरंतो एक्सप्रेस स्वागत कार्यक्रमात खासदार अमर काळे यांचे वक्तव्य आहे.
महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयातील निवासी डॉक्टर उद्यापासून संप पुकारणार आहेत. वरिष्ठ निवासी डॉक्टरांचा मागच्या २ महिन्यांचा पगार थकला आहे.
परभणी जिल्ह्यात सध्या उन्हाचा प्रचंड कहर पाहायला मिळत आहे. गेल्या पाच दिवसांपासून तापमान चाळीशीच्या पुढेच राहत असून आज तब्बल 41.7 अंशांवर पोहोचले आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत, तर रस्त्यांवरील वर्दळही कमी झाल्याचे चित्र दिसत आहे.
लातूरच्या एमआयडीसीत असलेल्या मुंदडा अल्युमिनियम या कारखान्याला भीषण आग लागली , आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत, दरम्यान या आगीत दोन ते तीन कामगार अडकल्याची देखील भीती व्यक्त करण्यात येते आहे. तर दोन जण गंभीरित्या भाजल्याने त्यांना उपचारासाठी हलवण्यात आलं, धुराचे परिसरात प्रचंड मोठे लोट आहेत.
हवामान विभागानं पुढील काही दिवस प्रखर उष्णता राहण्याचे संकेत दिले आहे. भंडाऱ्याचं कालचं तापमान 42 अंश होतं. सलग दुसऱ्या दिवशी आज भंडाऱ्याचं तापमान 42 अंश असल्याची नोंद करण्यात आली. प्रखर उष्णता राहणार असल्यानं नागरिकांनी घराबाहेर पडू नये, आणि अती महत्वाचे काम असल्यास स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन कामासाठी घराबाहेर पडण्याचे आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील निगडी परिसरामध्ये काल संध्याकाळी अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्याने भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी निगडी येथील एमएसईबीच्या कार्यालयात झोपून ठिय्या आंदोलन केल आहे. निगडी येथील सेक्टर 22 या ठिकाणी काल संध्याकाळी सहा वाजता दरम्यान अचानक वीज पुरवठा काही तांत्रिक कारणामुळे खंडित झाला होता.
चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी चंद्रपूर दौरा केला. दौरा सुरू असतानाच महामाया कोल वॉशरीच्या प्रदूषणाने पंकजा मुंडे यांना सलामी दिली. मंत्र्यांच्या भेटीच्या दिवशीच परिसरात कोळशाची धूळ आणि काळा धूर पसरल्याने दौऱ्यातील सर्व वाहने कालवंडल्याचे दृश्य बघायला मिळाले. महामाया कोलवाशरीने पर्यावरणमंत्री येणार म्हणून तयारी केली होती. मात्र ती फोल ठरली. चंद्रपूरच्या दौऱ्यावर असलेल्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाहनावर देखील येथील प्रदूषणाचा प्रभाव दिसला.
महिला आरक्षण विधेयकावर पंतप्रधान मोदी म्हणाले, "आम्ही देशाला एक नवी दिशा देणार आहोत. हे विधेयक राष्ट्राचे भविष्य ठरवेल. हे विधेयक २५-३० वर्षांपूर्वीच मंजूर व्हायला हवे होते, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चितळे बंधू फूड प्लांटचे उद्घाटन
उद्घाटन करत देवेंद्र फडणवीस करणार चितळे फूड प्लांटची पाहणी
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज MIDC मधील रांजणगाव शेंनपुंजी येथील कमल गॅस एजन्सीमध्ये घरगुती गॅस सिलेंडर मिळत नसल्याने एका व्यक्तीने संतापाच्या भरात स्वतःचे डोके फोडून घेतल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली. बालचंद नेमाने (वय ५०, रा. रांजणगाव) असे जखमी व्यक्तीचे नाव असून, ते अनेक दिवसांपासून गॅस सिलेंडरसाठी एजन्सीच्या चकरा मारत होते. मात्र वारंवार प्रयत्न करूनही गॅस उपलब्ध न झाल्याने ते संतप्त झाले.
जालना शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. दोन दिवसांपूर्वी जालना शहरातील चंदनझिरा परिसरामध्ये एका चार वर्षीय चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याने शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक आक्रमक झालेत. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा नाहीतर महानगरपालिकेत मोकाट कुत्रे सोडू असा थेट इशारा शिवसेना नगरसेवक दुर्गेश कठोटीवाले यांनी दिला आहे.
बुलढाण्यातील खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात शेकडो वारकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी काहीशी भूमिका वारकऱ्यांनी घेतल्यामुळे खामगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयात काहीसा तणाव बघायला मिळत आहे. संपूर्ण उपविभागीय अधिकारी कार्यालयात वारकरी घुसल्याने व विशेषतः महिला वारकरी असल्याने कार्यालयातील कामकाज ठप्प झालं आहे.
गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाणी पिण्याच्या किरकोळ कारणावरून विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये तुफान फिल्मी स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेच्या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, दहशत निर्माण करण्याच्या उद्देशानेच हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची मोठी बाजारपेठ आहे. तर 28 जानेवारीला नवीन हळदीचा शुभारंभ झाला होता. आजअखेर तब्बल नऊ लाख पोतीची हळद ही विक्री झाली आहे. तर मार्केट मध्ये हळदीचे आवकजावक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी वर्ग आनंदीत आहे. दिवसाला वीस ते पंचवीस पोती हळदीची विक्री होत आहे. यावर्षीचा हंगामही चांगला सुरू आहे.
दिंडोशी पोलिसांची कारवाई; भोंदू बाबाला अटक
आरोपीचे नाव रिधम पांचाल उर्फ मॉन्टी पांचाल (वय ३७)
“देवी अंगात येते” असा दावा करत उपचाराच्या नावाखाली फसवणूक
भक्तांकडून पैसे, कोंबडी, बकऱ्याचे काळीज, दारू आणि सिगारेटची मागणी
मालाडमधील मैदानावर गुरुवार व शनिवार रात्री दरबार; रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत कार्यक्रम
पुरुष, महिला आणि तरुणींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती
सर्व आजार बरे करण्याचे दावे; निपुत्रिक महिलांना मूल होण्याचेही आश्वासन
सिगारेट तोंडात धरून “भूतबाधा काढण्याचे” प्रकार
दूरदूरहून लोक समस्या घेऊन येत असल्याची माहिती
जालना जिल्ह्याला पुढचे तीन दिवस उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय.16 ते 18 एप्रिल दरम्यान उष्णतेचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला असून, दुपारी बारा ते तीन या वेळेमध्ये अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर कोणी जाऊ नये, तसेच बाहेर जाताना गॉगल्स छत्री टोपी बूट किंवा चप्पल वापरावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दीपक काजळकर यांनी केलय.तसेच उलटी मळमळ चक्कर डोकेदुखी होत असेल तर जवळच्या आरोग्य केंद्राची तत्काळ संपर्क साधावा असे देखील आवाहन काजळकर यांनी केलय..
सोलापूरचा तापमानाचा पारा पोहोचला थेट 43.2 अंशावर, यंदाच्या मोसमातील सर्वोच्च तापमानाची नोंद
सोलापूरच्या तापमानाचा पारा पोहोचला थेट 43.3 अंशावर ; सोलापूर जिल्ह्याला उष्णतेचा येलो अलर्ट जारी
यंदाच्या हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद
25% आद्रता, कोरडा हवेने उष्माघाताचा धोका वाढला
सोलापुरातील मुख्यमार्गांवर कर्फ्यूजन्य परिस्थिती
डीहायड्रेशन टाळण्यासाठी भरपूर पाणी पिण्याचे पालिका प्रशासनाचे आवाहन
उद्या नारीशक्ती विधेयक सादर होणार
आज आणि उद्या मिळून १२ तास चर्चेचा प्रस्ताव
उद्या संध्याकाळी ४ वाजता विधेयक सादर होणार
नारीशक्ती विधेयक मांडण्यासाठी लोकसभेत चर्चा
विधेयक मांडण्याच्या बाजूने २५१ खासदारांची मते
विधेयक सादर करण्याच्या विरोधात १८५ मते
धाराशिव शहरात आंबेडकर जयंती निमित्त काढलेल्या मिरवणुकीत पोलिसांची मोठी कारवाई
धाराशिवमध्ये 42 डीजे मालक व आयोजकांवर गुन्हे दाखल
डीजे डॉल्बीवर जप्तीची कारवाई, डॉल्बी कंटेनर जनरेटर सर्व साहित्य केले जप्त
आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या 42 डीजे मालक आणि आयोजकांवर गुन्हे
मिरवणुकीदरम्यान अतिशय कर्कश व मोठ्या आवाजात डीजे-डॉल्बी वाजवले
आवाजाची ठरलेली मर्यादा पूर्णपणे ओलांडली
नागरिक, महिला आणि पोलिसांना शारीरिक त्रास
वेगवेगळ्या 3 निकषानुसार गुन्हे दाखल, पूर्वसूचना देऊनही नियमभंग केल्यामुळे कारवाई
विठ्ठल मंदिराच्या जतन आणि संवर्धनाच्या कामामध्ये आता प्रत्यक्ष विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्याच्या पाठीमागील बाजूचे काम सुरू करण्यात आले आहे. विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर असणारी बाजीराव पडसाळी आणि पाठीमागे असणारी रुक्मिणी मंदिर परिसराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम जतन आणि संवर्धनाच्या दुसऱ्या टप्प्यात सुरू करण्यात आले. हेच काम गतिशील पद्धतीने पुरुषोत्तम अधिकमासाच्या पूर्वी पूर्ण करावे. अशी मागणी होतीय. या संवर्धनाच्या कामामुळे सध्या विठ्ठल मंदिराचे प्रमुख द्वार असणारे पश्चिम द्वार हे बंद ठेवण्यात आले आहे.
विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणाला आज आणि उद्या उष्णतेचा येलो अलर्ट...
विदर्भातील नागरिकांना विशेष काळजी घेण्याची गरज...
आज अनेक जिल्ह्याचे तापमान 45 पेक्षा अधिक जाण्याची शक्यता...
तापमानाबाबत अनेक चुकीचे आणि खोटे संदेश समाज माध्यमावर फिरत आहेत या अफ़वावर विश्वास ठेवू नका
अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा अस पुणे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेय...
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज वर्धा जिल्ह्यात
महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमात राष्ट्रपती दाखल
महात्मा गांधी यांना करत आहे अभिवादन
बापू कुटीची राष्ट्रपती यांच्या कडून पाहणी
केंद्र सरकारच्या प्रस्तावीत नारीशक्ती वंदन विधेयकाच्या समर्थनार्थ बुधवार अलिबाग येथे भाजपा महिला आघाडीतर्फे पदयात्रा काढण्यात आली. भाजप महिला आघाडी दक्षिण रायगडच्या जिल्हा उपाध्यक्षा ॲड. मनस्वी मोहिते यांच्या नेतृत्वाखालील या पदयात्रेला महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी विधेयकाच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम देखील राबवण्यात आली. अलिबाग शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या पदयात्रेला प्रारंभ झाला. शहरभर फिरून श्री काळंबादेवी मंदिराजवळ या पदयात्रेची सांगता झाली. रॅलीदरम्यान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या जात होत्या.
पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला येथील सराईत गुन्हेगार आरोपी समाधान चव्हाण याला सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.
चव्हाण याच्यावर वाळू चोरी, अवैध दारू विक्री,मारहाण करणे असे एकूण 11 गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करून ही सुधारणा न झाल्याने अखेर दोन वर्षासाठी सोलापूर जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. आरोपी समाधान चव्हाण याला पुणे जिल्ह्यातील वालचंदनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
चांदिवली विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीनची आज तपासणी
मुंबईतील चांदिवली विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीनची तपासणी आज थोड्याच वेळात सुरू होणार आहे. या प्रक्रियेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
काँग्रेस नेते नसीम खान हे स्वतः उपस्थित राहणार आहेत. त्यांनी यापूर्वी चांदिवली विधानसभा निवडणुकीत वापरलेल्या ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला होता.
या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतान मुंबई उच्च न्यायालय यांनी महत्त्वपूर्ण आदेश दिले. न्यायालयाने ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
विशेष म्हणजे, पहिल्यांदाच उमेदवारांच्या उपस्थितीत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची प्रत्यक्ष तपासणी केली जाणार आहे, त्यामुळे या प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टीसीएस प्रकरणातील आरोपीचं दिल्ली ब्लास्टमधील आरोपीसोबत कनेक्शन ?
टीसीएस नाशिक प्रकरणातील एचआर मॅनेजर निदा खान फरारच, भिवंडीत लपल्याची माहिती
निदा खानचा दिल्ली ब्लास्टमधील डॉक्टर शहीनशी लिंक असल्याचा संशय
या कनेक्शनमुळे तपासाला राष्ट्रीय सुरक्षेचा आयाम
पोलिसांकडून विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू
संशयास्पद माहिती तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात कळवण्याचं आवाहन
टीसीएस प्रकरणात लैंगिक अत्याचार, धर्मांतराचे आरोप
तपास यंत्रणांकडून सर्व बाजूंनी सखोल चौकशी सुरू
पुढील काही दिवसांत मोठे खुलासे होण्याची शक्यता
नाशिकमधील टीसीएस लैंगिक शोषण प्रकरणात विशिष्ट हॉटेलमध्ये केल्या जात होत्या पार्ट्या
नाशिकच्या त्रंबकेश्वर रोडवरील एका रिसॉर्टमध्ये पार्ट्या झाल्याची नोंद
SIT कडून या हॉटेलची झाडाझडती घेत रजिस्टर घेण्यात आले ताब्यात
हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची आणि व्यवस्थापनाची कसून चौकशी
या हॉटेलमध्ये रात्री उशिरापर्यंत केल्या जात होत्या पार्ट्या
याच पार्ट्यांमध्ये हिंदू मुलींना या प्रकरणातील अटक करण्यात आलेले संशयित आरोपी लावत होते फूस
2022 ते 2023 दरम्यान या हॉटेलमध्ये केल्या जात होत्या पार्ट्या
पार्टी हॉल बरोबरच हॉटेलचे रुमही असायचे बुक
SIT च्या हातात ही महत्वपूर्ण माहिती लागल्याने आज यातील संशयित आरोपींना पुन्हा ताब्यात घेण्याची शक्यता
अंबरनाथच्या आनंद नगर एमआयडीसी परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने इन्वेंशिया हेल्थकेअर लिमिटेड कंपनीविरोधात आंदोलन करण्यात आले. मनसेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य द्यावे तसेच स्थानिक व्यावसायिकांना संधी उपलब्ध करून द्यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेत सेवानिवृत्त गट ‘क’ कर्मचाऱ्यांनी कंत्राटी पद्धतीने कार्यरत राहून शासनाची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी सूरज गायकवाड यांनी संबंधित अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.प्रशासनाच्या निषेधार्थ त्यांनी आज हलगी व संबळ वाजवून तीव्र आंदोलन द्वारे निषेध केला आहे .या आंदोलनास नगरसेवक संतोष आबनावे नगरसेवक गणेश कामठे संदीप हरपले प्रतीक हरपले यांन सहा ग्रामस्थ उपस्थित राहून व इतरांनी पाठिंबा दिला आहे .
वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे हिंगोली जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेलाय. हिंगोली बसस्थानक परिसरात एका 30 वर्षीय तरुणाचा उष्माघातानं मृत्यू झालाय. सध्या हिंगोलीतील तापमान 40 अंशावर गेल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
हिंगोलीत पिकप वाहन व दुचाकी मध्ये भीषण अपघात झाला आहे हिंगोली परभणी राज्य महामार्गावरील औंढा परिसरात असलेल्या खांडेश्वरी जवळ हा भीषण अपघात घडला आहे, हळद भरून विक्रीसाठी जाणाऱ्या भरधाव पिकप वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी वरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर पिकप चालक देखील गंभीर जखमी झाला आहे, सुरज उबाळे व गजानन कदम अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे असून नवनाथ कराळे असे गंभीर जखमी झालेल्या पिकप चालकाचे नाव आहे या घटनेमुळे मृत्यू झालेल्या तरुणांच्या गावावर शोक काळा पसरली होती
: एप्रिल महिन्याच्या मध्यावरच वाशिम जिल्ह्यात उन्हाचा कडाका तीव्र झाला असून, सूर्य अक्षरशः आग ओकत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. वाशिम जिल्ह्यात पारा 42 अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे, आणि आता त्याचा थेट फटका लघु व्यवसायिकांवर सुद्धा झाल्याच दिसून येत असून दुपारच्या सुमारास या दुकानांवर शुकशुकाट बघायला मिळतोय..अनेक रस्ते दुपारच्या सुमारास अनेक निर्मनुष्य झाले आहेत.
महापालिकेतील ‘टक्केवारी’च्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला असून, यावेळी वाद थेट सत्ताधारी भाजपच्या गोटातच पेटल्याचे पाहायला मिळाले. बाणेर येथील आदिवासी विद्यार्थिनींसाठी उभारण्यात येणाऱ्या निवासी शिक्षण केंद्राच्या कामावरून विद्यमान आणि माजी नगरसेविकांमध्ये महापालिकेतच जोरदार वादावादी, शिवीगाळ आणि गोंधळ उडाल्याची घटना बुधवारी घडली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
- नाशिक शहरात एटीएसचे पथक दाखल, एक अधिकारी आणि तीन कर्मचाऱ्यांनी सुरू केला तपास
- बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये होणाऱ्या प्रकाराची केंद्रीय तपास यंत्रणांकडून गंभीर दखल
- नाशिक शहर पोलिसांकडून याबाबतची माहिती घेत तक्रारदारांकडून घेतली जाणार माहिती
- स्वतः एटीएस आरोपींची करणार चौकशी, सीडीआर रिपोर्टतीही होणार तपासणी
महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचा मोदी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयानंतर देशभरात महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. नांदेड मध्ये देखील महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान 33 टक्के आरक्षण मिळाल्यानंतर महिलांनी नांदेड शहरात रॅली काढली. या रॅली महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या
बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत मोताळा पंचायत समितीतील कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता सचिन शुधन इंगळे (वय ३३) याला २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी २५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. तडजोडीनंतर २० हजार रुपये स्वीकारताना पिंपळगाव राजा-मोताळा रोडवरील फुली फाटा येथे सापळा रचून कारवाई करण्यात आली. आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आर्थिक वादातुन मेट्रो ठेकेदाराचे अपहरण करण्यात आले
खडी क्रशर प्लॅन्टसाठी जागा दाखविण्याची बतावणी करत ठेकेदाराचे अपहरण करून 50 लाखांची खंडणी मागण्यात आलीय
खराडी पोलिसांनी पाच जणांना अटक केली. या प्रकरणात अटक केलेले आरोपी खडी क्रशर (स्टोन क्रशर) चालक आहेत.
सागर दत्तात्रय झुरुंगे (वय ३९), विजय सुरेश वाळुंज (वय ३८), राजू विजयकुमार सहाणे (वय ३२), रूपेश शिवाजी गावडे (वय ३८, सर्व रा. लोणीकंद, पुणे-अहिल्यानगर रस्ता), प्रकाश बाळासाहेब राऊत (वय ३४, रा. तुळापूर, ता. हवेली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत मेट्रोतील ठेकेदाराने खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
राज्यात पुढील काही दिवसांत उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. विविध भागांमध्ये तापमान लक्षणीय वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. मध्य महाराष्ट्रात १५ ते १८ एप्रिलदरम्यान, मराठवाड्यात १६ ते १८ एप्रिलदरम्यान, विदर्भात १५ ते १९ एप्रिलदरम्यान तर कोकणात १५ ते १७ एप्रिलदरम्यान काही ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.
अकोल्यात 'बर्निंग बाईक'चा थरार पाहायला मिळालाये. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या 'बोचरा रुईखेड' रस्त्यावर दुचाकीने पेट घेतला आहे.. बघता बघता पूर्ण दुचाकी आगीच्या आटोक्यात आली होती.. रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीस्वारासमोर अचानकपणे रानटी डुक्कर आडवं आलं, आणि त्याच दुचाकीवरील नियंत्रण सुटलं, अन अपघात झाला.. 40 ते 50 फूट दुचाकी रस्त्यावर स्लिप होऊन घासत गेल्याने दुचाकीने पेट घेतला आहे.. या घटनेत दुचाकीस्वार जखमी झाला आहे... अक्षरशः आगीत दुचाकी पूर्णतः जळाली आहे.. रात्री उशिरा ही घटना घडली
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या वसई फाटा येथील एप्पल इन हॉटेल जवळ 15 किलोच्या गांजाची तस्करी करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला मीरा-भाईंदर वसई विरार पोलिसांच्या नार्कोटेक्स पथकाला आढळून आला आहे.
या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची अधिक चौकशी सुरू करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.