Kalyan District Court where bail of rape accused Balraj Singh was cancelled after RTI-based evidence revealed forged documents.  Saam tv
Video

Kalyan News: बलात्कार प्रकरणी बनावट कागदपत्रांद्वारे जामीन, आरोपी भाजपच्या माजी मंत्र्याचा नातेवाईक | VIDEO

BJP ex-minister’s kin involved : बनावट कागदपत्रांच्या आधारे जामीन मिळवल्याचे उघड झाल्यानंतर कल्याण न्यायालयाने बलात्कारप्रकरणातील आरोपी बलराज सिंगचा जामीन रद्द करत त्याच्यावर अजामीन वॉरंट काढले.

Omkar Sonawane

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

बलात्कार प्रकरणातील आरोपीने खोट्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे जामीन मिळवल्याचे सिद्ध झाल्याने कल्याण न्यायालयाने संबंधित आरोपीचा जामीन रद्द करत त्याच्या विरोधात अजामीन पत्र वॉरंट जारी केला आहे . या प्रकरणातील फिर्यादीने तब्बल वर्षभरापूर्वी खोट्या जामीनाबाबत पोलिसांकडे तक्रार केली होती. न्यायालयाच्या ही बाब पुरावेनुसार दाखवताच न्यायालयाने तत्काळ या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. धक्कादायक म्हणजे हरियाणाचे भाजपचे माजी मंत्री या प्रकरणातील आरोपी बलराज सिंगचे नातेवाईक आहे.

सदर पीडित तरुणीचे 2022 रोजी दिल्ली येथे आरोपी बलराज बलवंत सिंग यांच्याशी ओळख झाली होती .बलराज हा युट्युबर होता . पीडितेसोबत झालेल्या मैत्रीचा फायदा घेत बलराज बलराज सिंग याने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप करत पीडितेने फेब्रुवारी 2024 या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती . दरम्यान बलराज याचा नातेवाईक हरियाणा येथील भाजपचा माजी मंत्री असल्याचे देखील माहिती आहे व याच राजकीय नेत्याच्या संपर्कातून त्याने हा गुन्हा दाखल न करण्यासाठी फिर्यादीवर दबाव टाकण्यात आल्याचा देखील आरोप फिर्यादीने केला होता.

पोलिसांनी गुन्हा दाखल करत 9 एप्रिल 2024 रोजी आरोपी बलराज बलवंत सिंग याला अटक केली. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन महिन्यांनी मे 2024 मध्ये 50,000 रुपयांच्या पी.आर. बॉण्डवर बलराजचा जामीन मंजूर झाला होता. त्याने फिरोज सलीम कुरेशी या व्यक्तीचा जामीनदार म्हणून दाखला दिला होता. मात्र पीडीतेला संशय आला पीडितेने माहितीचा आधिकारात कागदपत्र मिळवले. हे कागदपत्रे खोटे असल्याचा संशय आला. तिने याबाबत 17 जुलै 2024 रोजी पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करत खोट्या जामीनदाराबाबत माहिती दिली. माहितीच्या अधिकारात सर्व कागदपत्र मिळवत याबाबत पोलिसांना माहिती दिली. या पोलीस तपासा दरम्यान जामीनदाराने दिलेली कर भरणा पावती बनावट होती.

आधारकार्डचा क्रमांक अमान्य असल्याचे निष्पन्न झाले. रेशन कार्डाचा फक्त एकच पान दिले गेल्याचे उघड झाले . या दरम्यान पीडिता स्वतः न्यायालयात दाद मागत होती. अखेर 26 जून रोजी या प्रकरणाची कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी बलराज याचा जामीन तत्काळ रद्द केला. तसेच आरोपी न्यायालयात उपस्थित नसल्याने त्याच्या विरोधात नॉन बेलेबल वॉरंट जारी करण्यात आलाय. शिवाय खोट्या जामीनदाराच्या विरोधातही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयानंतर पीडितेने समाधान व्यक्त केलं असून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pimpri : पिंपरीत वैष्णवी प्रकरणाची पुनरावृत्ती, आणखी एक हुंडाबळी | VIDEO

Shravan Name Meaning: श्रावण महिन्याचे नाव 'श्रावण' का पडले? जाणून घ्या जुना इतिहास

Shocking: खेळताना तोल गेला, १२ व्या मजल्यावरून पडून ४ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; रडून रडून आईचे बेहाल

Maharashtra Live News Update: मामा राजवाडे यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला

महायुतीच्या महामंडळ जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, भाजपला सर्वाधिक जागा?

SCROLL FOR NEXT