Jalgaon news  saam tv
Video

Crime News: गुप्तधनासाठी नरबळी? १४ वर्षाच्या मुलाचा निर्घृण खून | VIDEO

Jalgaon Horror: जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात रिंगणगावमध्ये चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलाच्या हत्येच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले.

Omkar Sonawane

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात रिंगणगावमध्ये चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलाच्या हत्येच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. मृत मुलगा कालपासून बेपत्ता होता, आज सकाळी एका काटेरी ढुडपात त्याचा मृतदेह आढळला.

मुलाच्या गळ्यावर तिक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले असून गुप्तधनासाठी मुलाचा नरबळी दिल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलाची निर्घृणपणे खून झाल्याची घटना घडली. अल्पवयीन मुलगा काल सायंकाळी सात वाजेपासून बेपत्ता झाला होता. रात्रभर शोध घेतलल्यानंतर आज सकाळी सहाच्या सुमारास त्याचा मृतदेह काटेरी झुडूपात आढळून आला. मुलाच्या गळ्यावर तिक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले असून गुप्तधनासाठी त्याचा नरबळी दिला असल्याचा धक्कादायक आरोप नातेवाईकांनी केला आहे. घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन तपासासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. हत्येच्या निषेधार्थ गावात संपूर्ण बंद पाळण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : तुम्ही सुद्धा चपातीचे पीठ फ्रीजमध्ये ठेवताय? मग वेळीच थांबा, नाहीतर...

Migraine Care: प्रवास करताना डोकेदुखी होतेय? जाणून घ्या कारणं अन् त्यावर सोपे उपाय

Ladki Bahin Yojana Scam : लाडक्या बहिणींचे पैसे लाटले, आता १४ हजार पुरुषांवर होणार कारवाई; सरकारचा इशारा

Bin Lagnachi Goshta: जुन्या नात्यांची नवी इनींग; निवेदिता सराफ-गिरीश ओक यांची 'बिन लग्नाची गोष्ट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले; ७५% लोकांची पसंती|VIDEO

SCROLL FOR NEXT