Karad Gang: 'या' ४ धारदार हत्याराने संतोष देशमुखांचा जीव घेतला, 'कराड गँगकडून' खास हत्यारं तयार, १५० वार करून देशमुखांना काळं निळं केलं अन्..

Accused Used Homemade Weapons to Brutalize Victim Beed News: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण. वापरलेली हत्यारे आणि वेपन एक्झामिनेशन रिपोर्ट समोर
Beed Sarpanch Murder Case
Beed Sarpanch Murder CaseSaam Tv
Published On

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण बीड पेटून उठलं होतं. या प्रकरणी सीआयडी आणि एसआयटीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. आरोपींचे फोटो आणि व्हिडिओ पाहून बीडच्या ग्रामस्थांची तळ पायाची आग मस्तकात गेली.

आता देशमुखांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेल्या हत्यारांचे फोटो आणि परिक्षण अहवाल समोर आला आहे. चार विशेष हत्यारांचा वापर करून देशमुखांची हत्या झाली असं अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

९ डिसेंबर २०२४ रोजी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेत त्यांच्यावर चार विशेष हत्यारांनी अमानुष मारहाण करण्यात आली होती. या हत्यारांची निर्मिती कराड गँगने खास हत्येसाठी केली असल्याची माहिती समोर आली आहे. या हत्यारांचा वापर करून आरोपींनी देशमुखांचा छळ करून त्यांची हत्या करण्यात आली होती.

Beed Sarpanch Murder Case
Hanuman Jayanti: हनुमान जयंतीच्या दिवशीच मंदिरात चोरांचा डल्ला, चांदीचे डोळे चोरण्याचा प्रयत्न

वापरलेली चार विशेष हत्यारे

गॅस पाईप

गाडीच्या क्लच वायरचा धातूचा चाबूक

लाकडी बांबूची काठी

लोखंडी पाईप

या चार विशेष हत्याराने सरपंच देशमुख यांना मारहाण झाली. हल्ल्यानंतर त्यांच्या अंगावर १५० जखमा आढळून आल्या होत्या. तपास यंत्रणेने हत्यारांची कल्पनाचित्र रेखाटून दोषारोपपत्रातून सादर केले होते. आरोपींनी यापूर्वी इतर व्यक्तींना याच हत्याराने मारहाण केल्याची देखील धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Beed Sarpanch Murder Case
Crime: बॅडमिंटन कोचचा प्रताप! एक्स्ट्रा क्लासच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर बलात्कार, फोनमध्ये प्रायव्हेट फोटो अन्

याशिवाय तीन डॉक्टरांच्या वैद्यकीय पथकाने दिलेल्या अहवालात या हत्यारामुळे मारहाण झाल्यास मृत्यू होऊ शकतो असे नमूद केले आहे. याच धक्कादायक वास्तवाची पुष्टी करणारा वेपन एक्झामिनेशन रिपोर्ट आता साम टीव्हीच्या हाती आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com