Crime: बॅडमिंटन कोचचा प्रताप! एक्स्ट्रा क्लासच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर बलात्कार, फोनमध्ये प्रायव्हेट फोटो अन्

Karnataka Crime News: एका बॅडमिंटन कोचने एक्स्ट्रा क्लासच्या नावाखाली १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Crime News
Crime NewsSaam Tv
Published On

कर्नाटकातील बंगळुरू येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका बॅडमिंटन कोचने एक्स्ट्रा क्लासच्या नावाखाली १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. तसेच नराधम वारंवार पीडित मुलीला अश्लील फोटो पाठवण्यास जबरदस्ती करायचा. पीडित मुलगी तिच्या आजीच्या फोनवरून नग्न अवस्थेतील फोटो शेअर करायची. आजीला याची माहिती मिळताच तिने मुलीच्या पालकांना याची माहिती दिली. पालकांनी तातडीने पोलीस ठाणे गाठत आरोपी विरोधात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पालकांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मुलीची विचारपूस केली. तेव्हा बॅडमिंटन कोचने एक्स्ट्रा क्लासच्या नावाखाली लैंगिक शोषण केल्याचे सांगितले. तसेच याबद्दल कुणालाही न सांगण्याची धमकीही दिली.

Crime News
Malegaon: धक्कादायक! १० वीची परिक्षा दिली अन् काही दिवसांतच विहिरीत उडी मारून आयुष्य संपवलं; परिसरात खळबळ

पीडितेच्या आईने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, तिच्या मुलीने दोन वर्षांपूर्वी येथील एका 'क्रीडा केंद्रात' बॅडमिंटन कोचिंगसाठी प्रवेश घेतला होता. प्रशिक्षकाने तिचे अनेक वेळा लैंगिक शोषण आणि छळ केल्याचा आरोप आहे. तो तिला त्याच्या घरी घेऊन गेला, जिथे त्याने तिचे लैंगिक शोषण केले.

Crime News
Dombivli : डोंबिवलीत रिक्षा बंद; वाहतूक पोलीस- रिक्षाचालकांमधील वाद चिघळला

पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

तक्रारीच्या आधारे, तामिळनाडू येथील रहिवासी असलेल्या प्रशिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. यानंतर गुरुवारी त्याला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान, आरोपीने कबूल केले की त्याने पीडितेवर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केले होते. तसेच त्याच्या फोनमध्ये अनेक मुलींचे नग्न अवस्थेतील फोटोही सापडलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com