india against pakistan saam tv
Video

Pahalgam Attack : भारताचं पाकिस्तानविरोधात थ्री लेयर ऑपरेशन कसं असेल? | VIDEO

India vs Pakistan : दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्याची पूर्ण तयारी भारतानं केलीय. घुसखोरी आणि हल्ले रोखण्यासाठी भारतीय लष्करानं थ्री लेयर ऑपरेशन सुरू केलंय. ते कसं असेल ते व्हिडिओतून बघा!

Nandkumar Joshi

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानच्या नाड्या आवळण्यास सुरुवात केली आहे. पाणी रोखल्यानंतर पाकिस्तान्यांना भारतात नो एन्ट्री म्हणत दुसरा स्ट्राइक केला. आता दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्याची योजना भारतीय लष्करानं आखली आहे.

पाकिस्तानकडून सातत्यानं होणारी घुसखोरी आणि दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने एक बेधडक आणि प्रभावी निर्णय घेतलाय. भारतीय लष्करानं काश्मीरमध्ये 'थ्री लेयर ऑपरेशन' सुरू केलंय. पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रास्त्र चाचण्या, लॉन्चपॅड्स आणि हालचालींवर सैन्याची थेट नजर असणार आहे. जे मार्ग नेहमी दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी वापरले जातात, त्यावरही लक्ष असेल. तसंच सैन्यानं काश्मीर खोऱ्यात लपून बसलेल्या विदेशी दहशतवाद्यांचा शोध घेण्याची मोहीम तीव्र केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अहिल्यानगर हादरले! प्रिन्सिपलने ८ वर्षांच्या विद्यार्थ्याचा घेतला चावा; गळा दाबून २० सेकंद हवेत उचलले

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा तडाखा; चाळीसगावजवळतच्या गांधी चौकातील नगरपालिकेची जुनी इमारत कोसळली

Cholesterol medicine: सकाळी की रात्री? रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा झाल्यानंतर कोलेस्ट्रॉलची औषधं कधी घेतली पाहिजेत?

Beauty Tips: डार्क अंडरआर्म्सपासून सुटका हवी? तर हे उपाय करतील मदत

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा दिपकेंना फोन, लग्नाबाबत काय विचारलं? | Video

SCROLL FOR NEXT