Switzerland Village Saam Tv
Video

Switzerland Village: हिमकडा कोसळला, अख्खं गाव गायब; पाहा VIDEO

Glacier Collapse in Switzerland: दक्षिण स्वित्झर्लंडमधील व्हॅलाइसच्या कॅन्टोनमध्ये असलेल्या ब्लॅटन नावाच्या गावावर हिमकडा कोसळला आणि अख्खं गाव गायब झालं. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून व्हायरल होत आहे.

Priya More

स्वित्झर्लंडमध्ये बर्च ग्लेशियर हिमनदीचा मोठा भाग कोसळला. यामुळे आल्प्स पर्वतरांगेतील बहुतेक भाग आणि इथली घरं बर्फाच्या ढिगाऱ्याखाली गेली आहे. हिमकडा कोसळल्यामुळे अख्खं गाव गायब झालं आहे. हिमनदीतील खडकांमधून पूर आल्याने ब्लॅटन हे गावदेखील पाण्याखाली गेला आहे. आतापर्यंत इथल्या ३०० लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे. मात्र अद्यापही काही जण बेपत्ता आहेत. जवळपास याठिकाणचा ९० टक्के भाग उद्ध्वस्त झाल्याचे समोर आलं आहे. हिमकडा कोसळल्यानंतरचे काही व्हिडीओ समोर आले असून ते सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ही घटना दक्षिण स्वित्झर्लंडमधील व्हॅलाइसच्या कॅन्टोनमध्ये असलेल्या ब्लॅटन नावाच्या गावात घडली. हिमकडा तुटल्यामुळे बर्फ, चिखल आणि दगड खाली पडले. यामुळे भूस्खलन सारखी परिस्थिती निर्माण झाली आणि गाव ढिगाऱ्याखाली गाडले गेले. बर्च ग्लेशियर ज्यावर सुमारे ९० लाख टन कचरा जमा झाला होता. सरकारी अभियंत्याने सांगितले की, हिमनदी दररोज ८ ते ११ फूट घसरत होती आणि अखेर ती कोसळली. ज्यामध्ये एका गावाचे ढिगाऱ्यात रूपांतर झाले. हे गाव पुन्हा बांधण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात आणि नुकसान किती झाले आहे याची माहिती अद्याप समोर आली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्र्याच्या भेटीवरून रामदास कदम यांची राज ठाकरेंवर टीका

घ्या बोंबला! रुग्णालयातील ECG विभागात कुत्रे घुसले|VIDEO

South Indian -Fried Rice Recipe : फ्राईड राईसला द्या साउथ इंडियन तडका, रात्रीच्या जेवणाचा चटपटीत बेत

Muramba: ७ वर्षांनंतर रमा-अक्षय येणार आमने-सामने; मुरांबा मालिकेत आरोहीमुळे येणार नवा ट्विस्ट

Shreyas Iyer: श्रेयस अय्यरला दुसरा धक्का; रहाणेच्या फीडबॅकने कर्णधारपदाचा गेम झाला

SCROLL FOR NEXT