Badrinath Glacier Collapses : मोठी बातमी : बद्रीनाथमध्ये मोठी दुर्घटना; हिमकडा कोसळला, ५७ जण अडकले

Badrinath Glacier Collapses : आपत्ती व्यवस्थापन सचिव विनोद सुमन यांनी सांगितले की, चमोली बद्रीनाथ धाममधील माना गावाजवळील एक हिमकडा कोसळल्यामुळे ५७ कामगार अडकले आहे.
Badrinath Glacier Collapses
Badrinath Glacier CollapsesSaam Tv News
Published On

बद्रीनाथ : हवामान पुन्हा एकदा बदललं आहे. हिमालयीन प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी होत आहे. सखल भागात पाऊस सुरू झाला आहे. बद्रीनाथ धाममध्ये दोन दिवसांपासून बर्फवृष्टी होत आहे. यादरम्यान, एक मोठी माहिती समोर आली आहे. आज शुक्रवारी दुपारी बर्फवृष्टीमुळे येथे मोठी आपत्ती आली. मुसळधार बर्फवृष्टीनंतर मोठा हिमकडा कोसळला आहे. या दुर्घटनेत ५७ कामगार बर्फाखाली अडकले असल्याचं सांगण्यात येत आहे. तर १६ कामगारांना वाचवण्यात यश आलं आहे.

प्रशासन आणि बीआरओ टीमला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आपत्ती व्यवस्थापन सचिव विनोद सुमन यांनी सांगितले की, चमोली बद्रीनाथ धाममधील माना गावाजवळील एक हिमकडा कोसळल्यामुळे ५७ कामगार अडकले आहे. तर १६ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. उर्वरित ४१ कामगारांचा शोध सुरू आहे. दरम्यान, चमोलीचे जिल्हा दंडाधिकारी संदीप तिवारी म्हणाले की, दळणवळण व्यवस्था अत्यंत वाईट स्थितीत असल्याने योग्य माहिती मिळत नाही.

Badrinath Glacier Collapses
पप्पा सॉरी, मम्मी सॉरी...बायकोच्या छळाला कंटाळून TCS मॅनेजरनं ७ मिनिटांचा व्हिडिओ करून आयुष्य संपवलं!

हवामान खात्याने अलर्ट जारी केला होता

चमोलीच्या वरच्या भागात गेल्या काही दिवसांपासून जोरदार बर्फवृष्टी होत असल्याचे सांगण्यात येत आहे. हवामान खात्याने आजसाठी आधीच ऑरेंज अलर्ट जारी केला होता. ३२०० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या भागातही बर्फवृष्टीची शक्यता होती. हिमस्खलनाची भीतीही व्यक्त करण्यात आली. आता बद्रीनाथ मंदिरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या महामार्गाजवळ हिमकडा कोसळला आहे. उत्तराखंडमधील माना गाव भारत आणि चीनच्या सीमेवर आहे. येथे एक आर्मी बेस कॅम्प आहे. म्हणून, सैन्य प्रथम बचाव कार्यात गुंतलं आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथके रवाना करण्यात आली आहेत. हिमकडा कोसळल्यामुळे बीआरओ पथकांनी बचावकार्यही सुरू केलं आहे.

Badrinath Glacier Collapses
Beed Crime: खळबळजनक! ७ वर्षांपूर्वी लग्न, सुखी संसारात विघ्न; सनकी नवऱ्याने बायकोला संपवलं, कारण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com