TCS Manager Ends Life After Posting 7-Minute Video : पापा सॉरी, मम्मी सॉरी, मी जगाचा निरोप घेतो, असे म्हणत टीसीएसमधील एका मॅनेजरने (TCS Manager) आयुष्य संपवले. आत्महत्या करण्याआधी त्याने बायको आणि सासुरवाडीच्या लोकांवर गंभीर आरोप केले होते. TCS मॅनेजरनं आयुष्य संपवण्याआधी ७ मिनिटांचा व्हिडीओ केला होता, त्यामध्ये त्याने त्याच्यासोबत घडलेल्या छळाच्या घटनेचा उल्लेख केला आहे.
पुरूषांना वाचवण्यासाठी कायद्याची गरज असल्याचेही त्याने म्हटलेय. बायकोच्या छळाला कंटाळून आयुष्य संपवणाऱ्या टीसीएस मॅनेजरचे नाव मानव शर्मा असे आहे. मानव शर्मा याची आपबिती समोर आल्यानंतर आग्रा येथील अनेकांचे मन सुन्न झाले.
पत्नी आणि सासरच्या त्रासाला कंटाळून मानव शर्मा याने टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्या करण्याआधी मानव शर्मा याने ६ मिनिटे ५७ सेकंदाच्या व्हिडीओत पोस्ट केला. बायकोच्या छळाला कंटाळून आयुष्य संपवत असल्याचे त्याने म्हटलेय. पुरूषांचा विचार करण्यात यावा, ते खूप एकटे पडतात. पुरूषांना वाचवण्यासाठी वेगळा कायदा कऱण्याची गरज आहे, असेही मानव शर्मा याने म्हटलेय.
टीसीएस मॅनेजर मानव शर्मा याच्या वडिलांनी सून आणि तिच्या माहेरच्या लोकांना जबाबदार धरलेय. बायको बॉयफ्रेंडसोबत मुंबईत राहत असल्याचा दावा मानवने व्हिडीओत केला आहे. मानवने व्हिडीओत बायकोच्या चारित्र्यावर गंभीर आरोप केले आहेत.
३० जानेवारी २०२४ रोजी मानव शर्मा याचं लग्न झालं. मानव शर्मा टीसीएसमध्ये काम करत होता, त्यामुळे बायकोसोबत मुंबईला राहात होता. सून दररोज नवऱ्यासोबत भांडत होती. कुटुंबाला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची ती मानव शर्मा याला वारंवार धमकी देत होती. सुनेचे विवाह बाह्य संबंध होते. ती बॉयफ्रेंडसोबत दिवस-रात्र बोल होती. २३ फेब्रुवारी मानव शर्मा आणि सून मुंबईवरून घरी परतले. त्याच दिवशी मानव शर्मा पत्नीला सोडण्यासाठी सासुरवाडीला गेला. २४ फेब्रुवारी रोजी त्यानं आयुष्य संपवले, असे मानव शर्मा याच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले.
मुलाने आपल्या पत्नीच्या छळामुळे कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप मानव शर्माच्या वडिलांनी केला. मानव शर्मा याचे वडील नरेंद्र शर्मा हे एअरफोर्समधील सेवानिवृत्त अधिकारी आहेत. त्यांना मानव शर्मा याच्या मोबाईलमध्ये आत्महत्या करण्याआधीचा एक व्हिडीओ मिळाला. त्याचा ७ मिनिटांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर पायाखालची वाळूच सरकली. आम्हाला फक्त न्याय हवाय, असे नरेंद्र शर्मा म्हणाले.
मानव शर्मा हिची पत्नी निकेता (Niketa Sharma) यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले. मानवने याआधी तीन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, गळफासाची दोरी तोडत एकदा मी त्याला वाचवले होते, त्यानंतर २३ फेब्रुवारी रोजी आम्ही आग्रा येथे आले. तो आनंदात मला घरी सोडून निघाला होत, पुरूषांचे कुणी ऐकत नाही, हे म्हणणं चुकीचे आहे, असे निकेताने सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.