Train accident saam tv
Video

Railway Accident: रुळावरून मालगाडी घसरलेचा|VIDEO

Train Accident Jalgaon: भुसावळ-सूरत रेल्वे मार्गावर मालगाडी ही रुळावरून सरकली असून मोठा अपघात घडला आहे. ही घटना घडताच रेल्वे अधिकाऱ्यांनी धाव घेत मदत आणि दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.

Omkar Sonawane

भुसावळकडून नंदुरबारकडे जाणारी मालगाडी आज दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास अमळनेरजवळ रुळावरून घसरली. या घटनेमुळे सुरत-भुसावळ रेल्वेमार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली असून, रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.

सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. लोको पायलट आणि गार्ड सुरक्षित आहेत. मात्र मालगाडीचे काही डबे रुळाखाली गेल्याने आसपासचे ट्रॅकही खराब झाले आहेत, त्यामुळे सूरत भुसावळ हा रेल्वेमार्ग बंद करण्यात आला आहे.

घटना स्टेशनपासून थोड्याच अंतरावर घडल्याने अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत आणि दुरुस्ती कार्य सुरू केले आहे. हा अपघात घडल्यानंतर बघणाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. रेल्वे अधिकाऱ्यांनी अपघाताबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला असून, नेमकी दुर्घटना कशी घडली याबाबत तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महत्वाची बैठक पुण्यात पार पडली

Saam Impact: हॉटेलवरील गुजराती पाट्या काढून लावल्या मराठी पाट्या; साम टीव्हीच्या दणक्यानंतर आली जाग|VIDEO

Maharashtra Politics : दहा वर्षे केंद्रात कृषीमंत्री, सहकारासाठी योगदान काय? विखे पाटलांची नाव न घेता शरद पवारांवर टीका

Nag Panchami 2025 : नाग पंचमीच्या तारखेपासून ते पूजेची पद्धत सर्व माहिती घ्या जाणून

Beed Shocking : तरुण डॉक्टरची इंजेक्शन घेऊन आत्महत्या; बीडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT