जळगाव : सुरत- भुसावळ रेल्वे लाईनवरील अमळनेर स्टेशनजवळ मालगाडी रुळावरून घसरल्याचे घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. यामुळे मोठी दुर्घटना टळली असून दोन्ही बाजूंचे रेल्वे ट्रॅक उखळून गेले असल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात आली आहे. तर दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरु करण्यात आले आहे.
सुरत- भुसावळ या रेल्वे लाईनचे दुहेरीकरण झाल्यानंतर या मार्गावर रेल्वे संख्या देखील वाढली आहे. नंदुरबारच्या पुढील काही भागात दुहेरीकरणाचे काम बाकी आहे. दरम्यान आज भुसावळकडून नंदुरबारकडे जाणारी मालगाडी अमळनेर स्टेशनजवळ रुळावरून घसरल्याने मालगाडीचे काही डबे रुळावर उलटले आहेत. आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास हा अपघात घडला आहे. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नसून रेल्वेचे लोको पायलट आणि गार्ड सुरक्षित आहेत.
मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद
दरम्यान मालगाडी रुळावरून घसरल्याने मालगाडीचे इंजिन देखील रुळावरून खाली उतरले आहे. यामुळे मालगाडीचे डब्बे उलटल्याने ते दुसऱ्या बाजूच्या ट्रॅकवर पडले आहेत. यामुळे आजूबाजूचे ट्रॅक देखील खराब झाल्याने सुरत- भुसावळ मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. दुपारनंतर सुरतकडे जाणाऱ्या व भुसावळकडे येणाऱ्या सर्व पॅसेंजर व एक्सप्रेस गाड्या थांबविण्यात आल्या आहेत. यामुळे रेल्वेच्या प्रवाश्यांचे प्रचंड हाल होणार आहेत.
दुरुस्तीच्या कामाला सुरवात
अमळनेर स्टेशनपासून काही अंतरावरच ही घटना घडल्याने तात्काळ अधिकाऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेतली. यानंतर रेल्वे प्रशासनाकडून लागलीच दुरुस्ती कामाला सुरुवात करण्यात आली आहे. तर रेल्वे अधिकाऱ्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला असून नेमका अपघात कसा झाला याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.