Shrirampur Police : श्रीरामपूर पोलिसांची मोठी कारवाई; १३ कोटी ७५ लाख रुपयांचा ड्रग्स जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

Ahilyanagar News : राज्यात छुप्या पद्धतीने अमली पदार्थ तसेच ड्रग्सची तस्करी होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मुळात अमली पदार्थ वाहतूक व विक्री करण्यास बंदी असताना देखील चोरून याची तस्करी केली जात आहे
Shrirampur Police
Shrirampur PoliceSaam tv
Published On

सचिन बनसोडे 

श्रीरामपूर (अहिल्यानगर) : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल १३ कोटी ७५ लाख रुपये किमतीचा ड्रग्सचा साठा जप्त केला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्सची तस्करी होत असताना पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस सखोल तपास करत आहेत.

राज्यात छुप्या पद्धतीने अमली पदार्थ तसेच ड्रग्सची तस्करी होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मुळात अमली पदार्थ वाहतूक व विक्री करण्यास बंदी असताना देखील चोरून याची तस्करी केली जात आहे. अशाच प्रकारे वाहतूक केली जात असताना श्रीरामपूर पोलिसांनी खंडाळा- दिघी रस्त्यावर रात्रीच्या सुमारास कारवाई केली आहे. यात मोठ्या प्रमाणात ड्रग्स आढळून आले आहे. 

Shrirampur Police
Kalyan Dombivali Police : कल्याण डोंबिवलीत ड्रग्स तस्करांविरोधात ५० गुन्हे दाखल; कल्याण पोलीसांची सहा महिन्यात कारवाई

दरम्यान श्रीरामपूर तालुक्यातील एमआयडीसी परिसरातील खंडाळा- दिघी रस्त्यावरून ड्रग्सची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांना मिळाली होती. त्यानुसार शिवपुजे यांच्या पथकाने सापळा रचत ड्रग्सची वाहतूक करणारा एक टॅम्पो अडवला. या वाहनातून अन्न आणि औषध प्रशासनाकडून प्रतिबंधित असलेला अल्प्राझोलम नामक पदार्थाच्या २१ गोण्या जप्त केल्या. 

Shrirampur Police
Washim Heavy Rain : वाशिम जिल्ह्यात मुसळधार; बाजार समितीमधील शेतमाल पाण्यात गेला वाहून, माल भरण्यासाठी शेतकऱ्याची धावपळ

दोघांवर गुन्हा दाखल, एकजण ताब्यात 

रात्रीच्या वेळी करण्यात आलेल्या कारवाईत ७० किलो वजनाचा तब्बल १३ कोटी ७५ लाख रुपये किमतीचा ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आला आहे. तर श्रीरामपूर पोलिस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला ताब्यात घेण्यात आले. श्रीरामपूर तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात मोठे ड्रग्स रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता असून पोलिस त्या दृष्टीने अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com