Kalyan Dombivali Police : कल्याण डोंबिवलीत ड्रग्स तस्करांविरोधात ५० गुन्हे दाखल; कल्याण पोलीसांची सहा महिन्यात कारवाई

Kalyan News : नशेखोरांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी मागील सहा महिन्यांपासून अमली पदार्थ विरोधी कारवाई सातत्याने सुरु आहे. या मोहिमेत मागील सहा महिन्यात तब्बल ५० गुन्हे दाखल करण्यात आले
Kalyan News
Kalyan NewsSaam tv
Published On

अभिजित देशमुख 
कल्याण
: अंमली पदार्थांची तस्करी व विक्री करण्यावर बंदी असताना देखील छुप्या पद्धतीने तस्करी केली जात असते. अशाच प्रकारे कल्याण- डोंबिवली परिसरातील चरस, गांजा, एमडी यासारख्या नशेच्या पदार्थाची विक्री करणाऱ्या ड्रग्स तस्करांवर कारवाईचा बडगा उगारत पोलीस डीसीपी स्कॉडने तब्बल ५० गुन्हे दाखल केले आहेत. तर २९ लाखाच्या अंमली पदार्थासह ६५ जणांना अटक करण्यात आली आहे.

कल्याण परिमंडळ तीनचा पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सुरुवातीपासूनच अमली पदार्थ विरोधी कारवाई मोहीम हाती घेतली आहे. तरुण पिढीला नशेच्या आहारी लोटणाऱ्या समाज कंटकांविरोधात कारवाई करत या नशेखोरांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी मागील सहा महिन्यांपासून अमली पदार्थ विरोधी कारवाई सातत्याने सुरु आहे. या मोहिमेत मागील सहा महिन्यात तब्बल ५० गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 

Kalyan News
Amravati : घराच्या गच्चीवर खेळताना घडले दुर्दैवी; विद्युत तारेला स्पर्श झाल्याने सात वर्षीय चिमुकला गंभीर

२९ लाख ५५ हजारांचा अमली पदार्थ जप्त 

दरम्यान रात्रीची गस्त वाढवत, निर्जन स्थळावर होणाऱ्या अमली पदार्थाच्या पार्ट्यांवर लक्ष ठेवत, गुन्हेगारांची धरपकड करत नशेचे अड्डे उध्वस्त केले जात आहेत. त्यानुसार ऑक्टोबर २०२४ ते मे २०२५ या सहा महिन्याच्या कालावधीत कल्याण- डोंबिवली पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत २९ लाख ५५ हजार रुपये किंमतीचा ११३.७३१ कि ग्रॅम गांजा, २५८.६१ ग्राम एमडी, १० ग्राम चरस आणि कोडीनयुक्त औषधाच्या बाटल्या असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. 

Kalyan News
Bribe Case : घरपट्टी नावावर करण्यासाठी उपसरपंचाने मागितली लाच; ३० हजार घेताना रंगेहाथ ताब्यात

सहा महिन्यात ५० गुन्हे दाखल
पोलिसांनी मागील सहा महिन्यात केलेल्या या कारवाईत ५० गुन्हे दाखल केले आहेत. तसेच या प्रकरणी ६५ आरोपीना बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस उपायुक्तांचे अमली पदार्थ विरोधी पथक २४ तास सक्रीय असून केवळ नशेखोरांवरच नव्हे; तर नशिल्या पदार्थाची विक्री करणाऱ्या तस्कर तसेच पुरवठादारांपर्यत पोहोचून ही साखळी तोडण्यासाठी आपले प्रयत्न सुरु असल्याचे झेंडे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com