Amravati : घराच्या गच्चीवर खेळताना घडले दुर्दैवी; विद्युत तारेला स्पर्श झाल्याने सात वर्षीय चिमुकला गंभीर

Amravati News : मागील बऱ्याच वर्षापासून जवळपास २०२१ पासून घरावरून गेलेल्या विद्युत वाहिनी बाबत वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. ग्रामपंचायतला नोटीस देत आहे. ग्रामपंचायतमध्ये ठराव सुद्धा मांडला होता
Amravati News
Amravati NewsSaam tv
Published On

अमर घटारे 

अमरावती : घराच्या अगदी जवळून गेलेल्या विद्युत तारा धोकेदायक ठरत आहेत. अशात घराच्या गच्चीवर खेळत असलेल्या चिमुकल्याचा या विद्युत तारांना स्पर्श झाला. ११ केव्हीची विद्युत वाहिनी असल्याने याचा जोरदार झटका बसल्याने सात वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे सदर घटना घडल्याचे बोलले जात आहे. 

अमरावती जिल्ह्यातील जवलापूर या गावात सदरची घटना घडली आहे. यात समर्थ जितेश रामेकर (वय ७) हा गंभीर जखमी झाला आहे. मागील बऱ्याच वर्षापासून जवळपास २०२१ पासून घरावरून गेलेल्या विद्युत वाहिनी बाबत महावितरणकडे वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. ग्रामपंचायतला नोटीस देत आहे. ग्रामपंचायतमध्ये ठराव सुद्धा मांडला होता. परंतु त्यावर अजूनपर्यंत काही उपायोजना केली गेली नाही; त्यामुळेच सदरची घटना घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. 

Amravati News
Buldhana Accident : लग्नसोहळा उरकून परतताना आक्रित घडलं, कारने धडक देत बाईकला २० फूट फरफटत नेलं; शिक्षकाचा मृत्यू

खेळता खेळता घडले दुर्दैवी 

दरम्यान सार्थक रामेकर हा दुपारच्या सुमारास घराच्या गच्चीवर खेळण्यासाठी गेला होता. खेळत असताना जिवंत वीजवाहिनीला स्पर्श झाल्याने त्याला जोरदार झटका बसला. यामुळे तो दूरवर फेकला गेला. या घटनेत चिमुकला गंभीर जखमी झाला. घटनेबाबत घरच्यांना व गावातील नागरिकांना समजताच सार्थक याला लागलीच अमरावतीच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

Amravati News
Wardha Crime : भाड्याची खोली करून नागपूरमध्ये वास्तव्य; मोबाइल चोरून बांगलादेशात विक्री करण्याचा धंदा, झारखंड येथून चोरटा ताब्यात

प्रकृती चिंताजनक 

गंभीर झालेला मात्र सात वर्षाचा समर्थ जितेश रामेकर हा चिमुकला अमरावती येथील रिम्स हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. यामुळे समस्त गावकरी रोष व्यक्त करत आहेत. समस्त गावकरी अशी मागणी देत आहे की यामध्ये दोषी असणारे अचलपूर डिव्हिजनचे उपकार्यकारी अभियंता, अंजनगाव सब डिव्हिजनचे कार्यकारी अधिकारी आणि पत्रोट सेंटर येथील सहायक कार्यकारी अभियंता यांच्यावरती कारवाईची मागणी करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com