Bacchu Kadu addresses media in Nanded, criticizes government for neglecting farmers amid heavy rains. Saam Tv
Video

Bacchu Kadu: आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त ऐश करत आहेत; सुट्ट्या काढून पळाले सगळे – बच्चू कडू संतापले|VIDEO

Ministers And Collectors On Leave: प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अद्याप मदत न मिळाल्याने जोरदार टीका केली आहे.

Omkar Sonawane

प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू हे आज नांदेड दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सरकार आणि सरकारी अधिकाऱ्यांवर जोरदार टीका केली. महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्याने शेतकरी हा हवालदिल झाला आहे. मात्र अजूनही सरकारकडून मदत न मिळाल्याने ही दिवाळी अंधारातच जाणार असे चिन्हं दिसत आहे. यावरच बच्चू कडू म्हणाले, शेतकऱ्याची दिवाळी अंधारात जाऊ देणार नाही अशा बऱ्याच गोष्टी मी ऐकतो.

शेतकऱ्याचे आयुष्यच अंधारात आहे दिवाळीचा काय विषय आहे. फडणवीस साहेब म्हणतात सगळ्यांना एकरी पाच-सहा हजार रुपये देणार आहोत. मला फडणवीस यांना प्रश्न विचारायला पाच-सहा हजारात दिवाळी कशी साजरी होईल. तुमची दिवाळी दोन लाखाचे फटाके फोडून साजरी करतात. शेतकऱ्याची दिवाळी पाच हजार रुपयात साजरी होईल. थोडी थोडी वाटली पाहिजे लाज असेल तर, असली तर वाटेल. अजूनही महाराष्ट्रात सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू केले नाहीत, मध्यप्रदेशमध्ये सुरू झाले छत्तीसगडमध्ये सुरू झाले महाराष्ट्रात का नाही. आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त ऐश सुरू आहे. सुट्ट्या काढून पळाले सगळे साले दिवाळीच्या अशी जोरदार टीका बच्चू कडू यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT