Gas Cylinder Issue Saam Tv
Video

Gas Cylinder: गॅस सिलिंडरचा तुटवड्यामुळे टेन्शन, इलेक्ट्रिक शेगड्यांची मागणी वाढली; खरेदीसाठी महिलांची गर्दी

Electric Stoves: गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे राज्यात इलेक्ट्रिक शेगड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गॅस सिलिंडर मिळत नसल्यामुळे त्याला पर्याय म्हणून गृहिणींनी इलेक्ट्रिक शेगड्या खरेदी करण्यासाठी गर्दी केली.

Priya More

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका हॉटेल व्यावसायिकानंतर सामान्य नागरिकांच्या स्वयंपाक घरांपर्यंत येऊन पोहचला आहे. या युद्धाची झळ स्वयंपाक घरापर्यंत येऊन पोहचल्या आहेत. गॅस सिलिंडर मिळत नसल्यामुळे त्यावर उपाय म्हणून गृहिणींकडून इलेक्ट्रिक शेगडीची मागणी वाढली आहे. युद्धा अगोदर घरगुती गॅस संपल्यानंतर दुसऱ्या दिवशीच गॅस सिलेंडर एजन्सीकडून पुरवठा केला जात होता. मात्र अमेरिका- इस्राईल आणि इराणच्या युद्धामुळे आता गॅस कंपन्या २५ दिवसांनंतर गॅस सिलेंडर देत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गॅस सिलिंडरचा तुटवडा भासू लागला आहे. व्यापारासाठी लागणारा गॅस तर मिळत नसल्याने हॉटेल चालकांवरती हॉटेल बंद करण्याची वेळ आली आहे. तर घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्यामुळे नागरिक आणि गृहणी चिंतेत आले आहेत. यावर उपाय म्हणून गृहिणींनी अखेर इलेक्ट्रिक शेगडी घेण्याकडे वळल्या आहेत. इलेक्ट्रिक शेगडी खरेदी करण्यासाठी महिलांनी दुकानांमध्ये मोठी गर्दी केली आहे. इलेक्ट्रिक शेगडीची मागणी वाढल्यामुळे दुकानातील स्टॉक देखील संपला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT