Locals carry out a daring rescue at Dugarwadi Waterfall as stranded tourists cling to safety ropes in Nashik’s monsoon flood. Saam tv
Video

Nashik News: नाशिकच्या दुगारवाडी धबधब्यावर पर्यटक अडकले; पर्यटकांच्या सुटकेचा थरारक रेस्क्यू, पाहा,VIDEO

Dugarwadi Waterfall Rescue Operation: नाशिकच्या दुगारवाडी धबधब्यावर अचानक पाण्याची पातळी वाढल्याने 20 पर्यटक अडकले होते.

Omkar Sonawane

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध दुगारवाडी धबधब्यावर रविवारी मोठा अनर्थ टळला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळलेली असताना अचानक पाण्याची पातळी वाढल्याने जवळपास 15 ते 20 पर्यटक या धबधब्याच्या पाण्यात अडकले. यामध्ये काही तरुण व काही लहान मुले देखील होती. या पर्यटकांना वाचवण्यासाठी स्थानिक तरुणांनी जीवाची बाजी लावत धडाकेबाज रेस्क्यू ऑपरेशन राबवलं.

पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या पर्यटकांना एकत्रित करून दोरांच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. या धाडसाचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रेस्क्यू करतानाचे हे क्षण अंगावर शहारे आणणारे असून, थोडक्यात मोठा अनर्थ टळल्याचं चित्र या व्हिडिओमध्ये दिसून येतं. प्रशासनाने देखील पर्यटकांना सतर्कतेचं आवाहन केलं असून, पावसाळ्यात धबधब्यांसारख्या ठिकाणी अनावश्यक गर्दी करू नये, असा इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT