What happened to the three Indian citizens abducted in Mali? : पश्चिम आफ्रिकेतील माली देशामध्ये एक सिमेंटच्या कारखान्यात काम करणाऱ्या तीन भारतीय नागरिकांचे अल-कायदा संबंधित दहशतवाद्यांनी अपहरण केलेय. भारत सरकारकडून गुरूवारी या वृत्ताला दुजोरा दिला असून नागरिकांच्या सुटकेसाठी पावले उचलली आहेत. माली देशाच्या अनेक भागांमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहेत. याच दरम्यान भारतीय नागरिकांचे अपहरण झाले. भारताने याबाबत चिंता व्यक्त करत माली सरकारला त्यांच्या सुटकेसाठी खबरदारी घेण्यास सांगितले आहे.
मालीमध्ये भारतीय नागरिकांच्या झालेल्या अपहरणाबाबत परराष्ट्र मंत्रालयाकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून माली सरकारला सुटकेसाठी पावले उचलण्याची विनंती केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सांगितले की, कायसमध्ये डायमंड सीमेंट फॅक्ट्रीमध्ये भारतीय लोक काम करत होते. एक जुलै रोजी दहशतवाद्यांनी फॅक्ट्रीवर हल्ला केला. या हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी भारतीय नागरिकांना बंधक केले. भारतीय सरकारकडून माली देशासोबत चर्चा करण्यात आली असून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पावले उचलण्याची विनंती करण्यात आली आहे. दरम्यान, आतापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनांनी घेतलेली नाही.
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, बामाकोमधील भारतीय दूतावास स्थानिक अधिकारी, पोलिस आणि डायमंड सिमेंट कारखान्याच्या व्यवस्थापनाशी सतत संपर्कात आहे. दूतावास अपहरण झालेल्या लोकांच्या कुटुंबियांशीही बोलत आहे. भारत सरकार या हल्ल्याचा तीव्र निषेध करते. आम्ही माली सरकारला विनंती करतो की, अपहरण झालेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षित आणि लवकर सोडवण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत.
वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. ते भारतीय नागरिकांना सुरक्षित आणि लवकर सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत, असे अश्वासनही परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आले. दरम्यान, सरकारने मालीमध्ये राहणाऱ्या सर्व भारतीयांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांना बामाकोमधील दूतावासाशी संपर्कात राहण्यास सांगितले आहे. दूतावास त्यांना आवश्यक माहिती आणि मदत देईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.