EOW officials escorting the accused in the Phoenix Investment scam case after arrests in Dombivli. Saam Tv
Video

Dombivli Investment Scam: डोंबिवलीतील ‘फिनिक्स इन्व्हेस्टमेंट’ घोटाळा उघड; शंभराहून अधिक गुंतवणूकदारांची 5,00,00,000 फसवणूक|VIDEO

Phoenix Investment Scam In Dombivli: डोंबिवलीत ‘फिनिक्स इन्व्हेस्टमेंट’ घोटाळा उघडकीस आला आहे. शंभराहून अधिक गुंतवणूकदारांची ४ ते ५ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

Omkar Sonawane

डोंबिवलीमध्ये जास्त परतावा आणि बोनस स्कीमचं आमिष दाखवून 100 पेक्षा अधिक गुंतवणूकदारांची 4 ते 5 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात मुख्य आरोपी गौरव भगत, बिपिन पाटणे, देवेंद्र तांबे आणि अमोल तायडे यांना ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने (EOW) अटक केली आहे. या आरोपींना आज कल्याण न्यायालयात हजर करण्यात आलं, जिथे न्यायालयानं त्यांना 6 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

आरोपींची चौकशी सुरू असून, इतर फरार आरोपींचा शोधही पोलीस घेत आहेत. तक्रारीनुसार ‘फिनिक्स इन्व्हेस्टमेंट’ आणि ‘फिनिक्स फायनान्शियल सोल्युशन एल.एल.पी.’ या नावाखाली भागीदारी संस्था सुरू करून गुंतवणूकदारांना मोठ्या परताव्याचं आमिष दाखवलं गेलं. सुरुवातीला काहींना थोडाफार नफा दिला गेला, पण नंतर मूळ रक्कमसुद्धा परत केली नाही. या प्रकरणात तब्बल 80 तक्रारी डोंबिवली पोलिसांत नोंदवल्या गेल्या होत्या. मात्र फसवणुकीची रक्कम कोट्यवधींवर गेल्याने तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला. या घोटाळ्यातील रक्कम 4 ते 5 कोटींपर्यंत पोहोचली आहे. EOW च्या टीमनं ठोस पुरावे जमा करून कारवाई केली असून, उर्वरित आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना झाली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबईतील सेंट झेविअर्स कॉलेज बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Railway Recruitment: रेल्वेत नोकरीची संधी; ११ हजारांपेक्षा जास्त पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Nora Fatehi : 'घाणेरडे लिरिक्स, डान्स अन्...' ; अश्लीलतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या, नोरा फतेही-संजय दत्तच्या गाण्याने संताप

Dehydration Signs: तुम्ही पुरेसं पाणी प्यायला नाहीत हे कसं समजतं? शरीर देतं ही 5 संकेत

Mumbai Crime: मुंबई हादरली! मनसे कार्यकर्त्याकडून तरुणाची हत्या, भररस्त्यात धारदार शस्त्राने सपासप वार

SCROLL FOR NEXT