Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

Jantar Mantar protest LIVE updates: संसदेपासून निघून हा मोर्चा ठरलेल्या मार्गाने मुख्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे आणि तिथून सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. या मोर्चातील सर्व घडामोडीचे लाईव्ह अपडेट एका क्लिकवर जाणून घ्या...
Congress Protest Live Update
Congress Protest Live Update

यापेक्षाही मोठं आंदोलन देशभरात उभं राहील -  दिप्ती चौधरी

देशभरातील काँग्रेसचे आजी-माजी आमदार दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. माजी आमदार दिप्ती चौधरी दिल्लीमध्ये दाखल झाल्या आहेत. ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा झाला पाहिजे यासाठी आम्ही राहुलजींचा आवाज बनत आहोत. यापेक्षाही मोठं आंदोलन देशभरात उभं राहील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

चलो दिल्ली

जननेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशातील लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. देशात मतचोरी झाल्याचे गंभीर आरोप आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा प्रश्न यावर आमची मागणी स्पष्ट आहे, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा आणि लोकशाहीचे रक्षण सुनिश्चित करावे.
अतुल लोंढे

Delhi Protest LIVE: केरळम विधानसभेत ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विशेष प्रस्ताव दाखल 

मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात राष्ट्रीय स्तरावर वाढत्या विरोधामधून आता केरळमधून एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. केरळचे मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन सोमवारी विधानसभेत मुख्य निवडणूक आयुक्तांना त्यांच्या पदावरून हटवण्याची मागणी करणारा एक विशेष प्रस्ताव मांडणार आहेत.

इंडिया आघाडीचं आंदोलन'ही' 6 मेट्रो स्टेशन बंद | Delhi INDIA Alliance Protest | Metro Stations Closed

दरम्यान इंडिया आघाडीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव दिल्लीतील 6 मेट्रो स्टेश बंद करण्यात येणारये. सकाळी 6 ते दुपारी 4 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात आले असून, प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून संबंधित स्थानकांवर इंटरचेंज सुविधा मात्र सुरळीत सुरू राहणारये. सुरक्षा यंत्रणांकडून दुपारी परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असून, त्यानंतर पुढील निर्णय जाहीर केला जाणारये...दरम्यान ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहुया कोणती मेट्रो स्टेशन बंद आहे...

सरन्यायाधीश Surya Kant यांचा इंडिया आघाडीच्या भेटीस नकार, पाहा काय दिलं कारण

विरोधी पक्षांच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंतच्या मोर्चाच्या नियोजनामुळे जंतरमंतरवर सुरक्षा वाढवण्यात आली.

Congress protest LIVE updates: काँग्रेसच्या महामोर्चामुळे दिल्लीत हायअलर्ट! मेट्रोची ६ स्थानके बंद; वाहतूक वळवली, प्रवाशांचे हाल

काँग्रेस आणि 'इंडिया' आघाडीच्या सर्वोच्च न्यायालयावर निघणाऱ्या महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून दिल्लीत कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (DMRC) कायदा व सुव्यवस्थेची स्थिती पाहता मध्य दिल्लीतील प्रमुख ६ मेट्रो स्थानकांची प्रवेश आणि बाहेर पडण्याची (Entry-Exit) दारे दुपारी ४ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, आंदोलनामुळे अनेक महत्त्वाच्या मार्गांवरील वाहतूक वळवण्यात आल्याने दिल्ली वाहतूक पोलिसांकडून ट्रॅफिक ॲडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. या अचानक लादलेल्या निर्बंधांमुळे नागरिक आणि प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा! | INDIA Alliance Protest

इंडिया आघाडी आज दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या विरोधात मोठं आंदोलन करणारये. इंडिय़ा आघाडी सर्वोच्च न्यायालयापर्यंत मोर्चा काढला जाणार असून यासाठी काँग्रेसच्या सर्व आमदार खासदारांना एकत्र जमण्याचे आदेश देण्यात आलेय... मतचोरी थांबवावी, SIRवर बंदी घालावी अशा मागण्याचं निवेदन काँग्रेस सरन्यायाधीशांना देणार आहे...

Congress Protest Live Update : सर्वोच्च न्यायालयाने भेट नाकारली

राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाला सरन्यायाधीश यांनी भेटीची परवानगी नाकारली

तुमच्या विषया च्या अनुशंगाने याचिका दाखल केल्यास त्यावरून सुनावणी घेऊ

सरन्यायाधीश यांनी केल स्पष्ट

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

मतदारयाद्यांमधील कथित अनियमितता, 'व्होट चोरी'चे आरोप आणि मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशाची राजधानी दिल्ली ढवळून निघाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वात 'इंडिया' आघाडीचा (INDIA Alliance) महामोर्चा काढला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com