
म्हाडाच्या घरांच्या किंमती गगनाला भिडल्या
म्हाडाच्या घरांसाठी जमिन उपलब्ध करण्याचे आव्हान
ठाणे, पनवेल, पालघर परिसरात जमीन उपलब्ध करण्याची मागणी
मुंबईत घरांच्या आकाशाला भिडलेल्या किमतींमुळे सर्वसामान्यांसाठी परवडणारी घरे उभारणे म्हाडासमोर मोठे आव्हान ठरत आहे. मुंबईत जमीन उपलब्ध नसल्यामुळे म्हाडा कोकण मंडळाने आता आपले लक्ष एमएमआरकडे वळवले असून ठाणे, पनवेल, पालघर परिसरात साडेतीनशे हेक्टर सरकारी जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी
अलीकडेच म्हाडा कोकण मंडळाने ५२८५ घरांसाठी सोडत काढली होती. या सोडतीला तब्बल पावणेदोन लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी अर्ज करून पसंती दर्शवली. यावरून मुंबईनंतर ठाणे, पनवेल, पालघर, वसई परिसर नागरिकांसाठी घरांची नवी पसंतीची ठिकाणे बनत असल्याचे स्पष्ट होते.
मात्र सध्या या परिसरात म्हाडाकडे घरे उभारण्यासाठी जमीन उपलब्ध नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे ठाणे, पनवेल, पालघर, अंबरनाथ, भिवंडी, वसई या भागांतील सरकारी जमीन म्हाडाला मिळावी यासाठी कोकण मंडळाकडून सक्रिय पाठपुरावा सुरू आहे.
राज्य सरकारने यापूर्वी एमएमआरडीएला बोरिवली-ठाणे भुयारी मार्गासाठी ६ हजार चौरस फूट भूखंड दिल्यानंतर म्हाडाला बदल्यात अवघी १,०५० घरे मिळाली होती. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात जमीन उपलब्ध करून दिल्यास म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांच्या योजना गती घेऊ शकतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.