Amba Haldi Benefits Foot Sprain : पाय मुरगळल्यावर ताबडतोब आंबेहळदीचा सोपा उपाय करा; सूज आणि वेदना होईल कमी

Manasvi Choudhary

पाय मुरगळणे

प्रवासादरम्यान पाय मुरगळण्याच्या घटना घडत असतात. पाय घसरून पडल्याने पाय मुरगळतो. अशावेळी नेमकं काय करावे हे समजत नाही.

Foot Sprain

पाय मुरगळण्याची लक्षणे

पाय मुरगळल्यास किंवा मुक्का मार लागल्यास त्या भागात तीव्र वेदना होतात, पाय लाल होतो आणि लगेचच सूज येते.

Foot Sprain

आयुर्वेदिक उपाय

अशा वेळी तुम्ही घरगुती सोपा आयुर्वेदिक उपाय करणे महत्वाचे आहे. पाय मुरगळण्यावर आंबेहळदीचा सोपा उपाय प्रभावी आहे.

Amba Haldi Benefits Foot Sprain

आंबेहळद आणि मोहरीच्या तेलाचा लेप

गॅसवर एका छोट्या भांड्यात १ चमचा आंबेहळद आणि २ चमचे मोहरीचे तेल एकत्र करा.

यामध्ये थोडे सैंधव मीठ टाका आणि हे मिश्रण मंद आचेवर हलके कोमट करा.

Amba Haldi Benefits Foot Sprain

सूज आलेल्या भागी लेप लावा

गॅस बंद करून हे कोमट झालेले मिश्रण पाय दुखणाऱ्या किंवा सूज आलेल्या भागावर लावा.

लेप लावल्यानंतर त्या भागाला थोडा वेळ विश्रांती द्या. काही वेळातच पायाची सूज आणि वेदना कमी होईल.

Amba Haldi Benefits Foot Sprain

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Canva

NEXT: White Saree For Womens: महिलांसाठी पांढऱ्या रंगाच्या साड्यांचे सुंदर कलेक्शन, या 5 डिझाईन्स नवरात्रीसाठी बेस्ट

White Saree For Womens
येथे क्लिक करा..