Devotees perform Goda Aarti standing in floodwaters of Godavari River at Ramkund, Nashik, amidst heavy monsoon rainfall. Saam Tv
Video

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

Devotees perform Goda Aarti: नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे रामकुंड परिसरात पूरस्थिती निर्माण झाली असूनही भाविकांनी श्रद्धेने पुरात उभं राहत गोदा आरती पार पाडली. वाढत्या पाण्याच्या प्रवाहात पार पडलेली ही आरती श्रद्धेचा आगळा अनुभव ठरली.

Omkar Sonawane

नाशिकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पुरस्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला असून नदीकाठच्या रामकुंड परिसरातील घाटांवर पाणी साचले आहे. अशा कठीण परिस्थितीत देखील भाविकांची श्रद्धा डगमगलेली नाही.

गोदावरी नदीच्या पाणीपातळीत झालेल्या मोठ्या वाढीमुळे रामकुंड परिसर पूर्णतः जलमय झाला आहे. मात्र, या जलप्रलयातही भाविकांनी पुराच्या पाण्यात उभं राहत पारंपरिक गोदा आरती केली. पावसाच्या सतत सुरू असलेल्या सरी आणि वाढत्या पुराच्या प्रवाहात भक्तिभावाने पार पडलेली ही आरती अनेकांसाठी एक आगळा-वेगळा अनुभव ठरली.

नाशिककरांनी पाण्यात उभं राहत देवतेसाठी आरती करताना श्रद्धेचे अनोखे उदाहरण घालून दिलं. ही आरती पाहण्यासाठी अनेकांनी परिसरात गर्दी केली होती. पोलिस आणि महापालिका प्रशासनाकडून सतर्कता राखण्यात येत असून, नागरिकांनी नदीकाठच्या भागात जाऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज, काय आहे वैशिष्ट्यं ?

Local Body Election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा सिक्सर,शिंदेसेनेत एकाच घरात 6 उमेदवार

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

SCROLL FOR NEXT