BMC Mayor Rity Tawade Saam Tv
Video

BMC Mayor: मुंबईचा कारभारी ठरला! लाडकी बहीण झाली BMC ची महापौर, मराठमोळ्या रितू तावडेंच्या हाती सूत्रे

BMC Mayor Rity Tawade: मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे यांची बिनविरोध निवड झाली. तर उपमहापौरपदी शिवसेना शिंदे गटाचे संजय घाडी यांची निवड झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दोघांनी सुत्रं हाती घेतली.

Priya More

मुंबई महानगरपालिकेला अखेर महापौर मिळाला. मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे आणि उपमहापौरपदी शिवसेना शिंदे गटाचे संजय घाडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. रितू तावडे यांनी महापौरपदाची सूत्रे हाती घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई महानगर पालिकेच्या महापौरपदी रितू तावडे आणि उपमहापौरपदी संजय घाडी विराजमान झाले. मुंबई महापालिकेच्या इतिहासात दुसऱ्यांदा भाजपच्या महापौराची निवड झाली आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये रितू तावडे या भाजपच्या पहिल्या महिला महापौर आहेत. आतापर्यत मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता होती. मुंबई महानगर पालिकेवर दुसऱ्यांदा भाजपचा झेंडा फडकला. रितू तावडे यांनी महापौरपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी एकच जल्लोष केला. यावेळी 'जय श्रीराम' आणि 'मोदी मोदी'च्या घोषणा देण्यात आल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

मधुचंद्राच्या रात्रीत पान का खायला दिलं जातं? कोणालाच माहिती नाहीये हे भन्नाट कारण?

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

SCROLL FOR NEXT