Minister Bharat Gogawale addressing Shiv Sena workers at Kudal, sparking controversy with his remarks on Narayan Rane’s political rise. saam tv
Video

Maharashtra Politics: नारायण राणेंनी मर्डर, मारामाऱ्या सगळं केलं, भरत गोगावलेंचं खळबळजनक वक्तव्य|VIDEO

Political Turmoil in Sindhudurg: शिवसेना मेळाव्यात भरत गोगावले यांनी नारायण राणेंवर खळबळजनक विधान करत त्यांची उंची मर्डर व मारामाऱ्यामुळे मिळाल्याचे सांगितले.

Omkar Sonawane

नारायण राणे हे एवढ्या उंचीवर सहजासहजी गेलेले नाहीत. अंगावर केसेस घेतल्या, जेलमध्ये गेले, भानगडी केल्या, मारामारी केल्या, मर्डर सगळं झालं. वेगळं सांगायची आवश्यकता नाही. निलेश राणे यांनी भानगडी करायची गरज नाही. सगळं जुळवून चालायचं. आम्हाला पण जुळवून घ्यावं लागतं, हा आमचा सल्ला आहे असे वक्तव्य मंत्री भरत गोगावले यांनी कुडाळ येथे आयोजित शिवसेना मेळाव्यात केले होते.

यावरच ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी दुजोरा दिला आहे. भरत गोगावले यांनी नारायण राणेंबद्दल केलेले ते वक्तव्य खर आणि अत्यंत योग्य आहे. कारण नारायण राणेंनी संघटना अशाच पद्धतीने वाढवली असा गंभीर आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.

भरत गोगावले काल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सिंधुदुर्गात आले होते. त्यांना माझा सवाल आहे, नारायण राणेंनी मर्डर, मारामाऱ्या करून पक्ष वाढवला तसंच तुम्ही सुद्धा विरोधी पक्षांच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना मारामारी, खून, दडपशाही करून तुमचा पक्ष वाढवण्याचे संकेत देण्यासाठी आला होता का? असा प्रश्न माझा भरत गोगावलेंना आहे असंही वैभव नाईक म्हणालेत.

नारायण राणे हे एवढ्या उंचीवर सहजासहजी गेलेले नाहीत. अंगावर केसेस घेतल्या, जेलमध्ये गेले, भानगडी केल्या, मारामारी केल्या, मर्डर सगळं केलं अस वक्तव्य मंत्री भरतशेठ गोगावले यांनी कुडाळ येथे आयोजित शिवसेना मेळाव्यात केलं होतं. त्या वक्तव्यावरून वैभव नाईक यांनी नारायण राणेंसह भरत गोगावले यांच्यावर टीका केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

SCROLL FOR NEXT