Santosh Deshmukh Case Update SaamTv
Video

Santosh Deshmukh Case : पुरावे मिळूनही कारवाई का नाही? धनंजय देशमुखांचा संतप्त सवाल | VIDEO

Dhananjay Deshmukh : संतोष देशमुख यांची हत्येनंतर या प्रकरणातील आरोपी पुण्याच्या दिशेने जातानाचा आणखी एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. त्यानंतर धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना पोलीस यंत्रणेच्या तापासावर शंका व्यक्त केली आहे.

Saam Tv

मला यंत्रणेवर शंका येत आहे त्याचे कारण सीसीटीव्ही व्हिडिओ माध्यमांना भेटतात, मग यंत्रणा त्यांच्यापर्यंत का पोहोचत नाही? माध्यमांना हे व्हिडिओ मिळतात मग यंत्रणेने काय केले आहे? असे प्रश्न उपस्थित करत यंत्रणेने आत्तापर्यंत काय काय हस्तगत केले याची माहिती देशमुख कुटुंबाला दिली पाहिजे, अशी मागणी धनंजय देशमुख केली आहे. बीडच्या केजमधील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर या प्रकरणातील आरोपी पुण्याच्या दिशेने जातानाचा आणखी एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. यावर संतोष देशमुख बंधु धनंजय देशमुख यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी पुढे बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की, माझ्या भावाच्या हत्येचे जे आरोपी आहेत, त्यांना शिक्षा देताना हे महत्त्वाचे आहेत. आमचा विश्वासघात झाला तर याला जबाबदार कोण याचे उत्तर आम्हाला हवे आहे. आत्तापर्यंत यंत्रणेने काय काय हस्तगत केले याची माहिती देशमुख कुटुंबाला दिली पाहिजे आणि याच बाबत आम्ही अधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत. जी घटना घडली त्यानंतर आरोपी सर्व जिल्ह्यात होते. सरेंडर होण्यासाठी त्या जिल्ह्याच्या बाहेर गेले. याची जबाबदारी सीआयडी एसआयटी यंत्रणा आहे आणि या सर्वांची माहिती आम्हाला मिळालीच पाहिजे. याचे उत्तर लेखी स्वरूपात पाहिजे आहे तोंडी घेणार नाहीत. मला आता संशय येतोय आरोपींना फरार करण्यात आणि आसरा देण्यास मदत करणाऱ्यांना कारवाई का केली नाही? या गोष्टीवर मला शंका आहे आणि त्याची माहिती मी घेणार आहे. जे समोर येत आहे, त्यावर पोलीस यंत्रणा व्यक्त झाली नाही. कराडला कोठडीत कमी आणि हॉस्पिटलमध्ये जास्त राहायचे आहे. आम्ही पीडित कुटुंब आहे यंत्रणे काय कारवाई केली पाहिजे की त्यांनी ठरवलं पाहिजे. आरोपींना अभय दिला नसता तर हा खून झाला नसता, अशीही खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अजित पवारांचा शरद पवारांना मोठा धक्का, दौंडचा शिलेदार घड्याळ हातात घेणार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

WhatsApp वर 'Online' दिसणं टाळायचंय? ही सेटिंग बंद करा, फॉलो करा 'हे' टिप्स

Sunday Horoscope Update : चूक केली असेल तर लगेच माफी मागा…; वाचा आजचे राशीभविष्य

Idli Recipe : रात्रीचा भात भरपूर उरलाय? झटपट बनवा मऊसर इडली

SCROLL FOR NEXT