Beed Rain SAAM TV
Video

Beed Rain : बीडमध्ये रेकॉर्डब्रेक पाऊस, सिंदफणा नदीला रौद्ररुप | पाहा VIDEO

Sindphana River Flood : बीड जिल्ह्यात गेल्या १० ते १५ दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक पाऊस झाल्यामुळे सिंदफणा नदीने रौद्ररूप धारण केल आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बीड जिल्ह्यात गेल्या १० ते १५ दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक पाऊसामुळे सिंदफणा नदीने रौद्ररूप धारण करत महापूर आला आहे. आष्टी ,पाटोदा, शिरूर या डोंगरपट्ट्यांमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. नदीकाठच्या गावांमध्ये पुराचं पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालं असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावे लागत आहे.

शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून पिके वाहून गेली आहेत.शेतीला तलावाचं स्वरुप प्राप्त झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल पिकं जे आहे ते पावसानं हिरावून घेतल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनकडून तात्काळ नुकसान भरपाईची मागणी होत आहे.दरम्यान, पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT