baramati news  saam tv
Video

Pune Baramati News: बारामतीत पूरसदृश परिस्थिति; NDRF च्या 2 तुकड्या रवाना|VIDEO

Baramati Battles Heavy Rain: बारामतीला पावसाने मोठे थैमान घातले असून संपूर्ण शहरात पूर सदृश परिस्थिति निर्माण झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून NDRF ची टीम बारामतीमध्ये रवाना झाली आहे.

Omkar Sonawane

बारामती तालुक्यातील पिंपळी लिमटेक येथे निरा कालवा फुटल्याने बारामतीमध्ये पूर सदृश्य परिस्थिति निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे कालव्यातील पाण्याचा प्रवाह वाढला आणि याच दबावामुळे कालव्याला भगदाड पडल्याचे सांगितले जात आहे. संपूर्ण बारामती पाणीमय झाले असून आता तिथे NDRF च्या दोन तुकड्या रवाना झाल्या आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या तिथे परिस्थिति नियंत्रणात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हे पथक रवाना झाले आहे. संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग देखील काही काळासाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे कालव्याचे पाणी थेट लोकांच्या घरात आणि शेतात शिरले आहे. याचीच खबरदारी म्हणून प्रशासनाने NDRF रवाना केली आहे. तसेच नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : सण साजरा करायला गेलेले परतलेच नाही! २४ तासांत ४९ जणांचा मृत्यू; भीषण घटनांनी देश हादरला

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात सोनं किती रुपयांनी स्वस्त; वाचा १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर

Sanjay Raut : राज्यावर ११ लाख कोटींचं कर्ज, संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; भाजपाच्या नेत्याकडून ५१ टन चारा वाटप, सोलापुरात आदर्श उपक्रम

Maharashtra News Live Update: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT