nashik news  saam tv
Video

Maharashtra Politics: माजी मंत्र्यासह या दिग्गज नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश, उत्तर महाराष्ट्रात ठाकरे गटाला सुरुंग|VIDEO

Political Shakeup in Nashik: नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठे खिंडार बसले असून आज अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Omkar Sonawane

गेल्या पंधरा दिवसांपासून ठाकरे गटाचे माजी उपनेते सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाला भाजपच्या नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी विरोध करून रान उठवले होते. मात्र हा विरोध मोडीत काढून अखेर बडगुजर यांना भाजपने पक्षात प्रवेश दिला. आज मोठ्या गाजत वाजत हा प्रवेश सोहळा पार पडला. तसेच त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री बबन घोलप यांचाही भाजपमध्ये प्रवेश झाला. बबन घोलप यांच्या कन्या माजी महापौर नयनाताई घोलप यांनीही कमळ हाती घेतले.

मनसेतून ठाकरे गटात गेलेले माजी महापौर अशोक मूर्तडक यांना महापालिकेची निवडणूक महत्वाची आहे. तर भाजपला एकापेक्षा अधिक ओबीसी चेहऱ्यांची गरज आहे. त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच मनसेचे महत्वाचे मानले जाणारे नेते माजी नगरसेवक दिलीप दातीर हे देखील भाजपमध्ये विलीन झाले आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्राची राजधानी असलेल्या नाशिकमध्ये ठाकरे गटाला सुरुंग लागल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : आज मराठा समाजाची पुण्यात महत्त्वाची बैठक

राज्यात आज 'ड्राय डे', मद्यपींचे वांदे होणार! २२ हजार हॉटेल-बार आज बंद, सरकारचा कोट्यवधीचा महसूल बुडणार

MHADA Lottery 2025: खुशखबर! म्हाडाची तब्बल ५२८५ घरांसाठी लॉटरी, आजपासून अर्जप्रक्रिया सुरु, कुठे कराल अर्ज?

Monday Horoscope : भगवान गणेशाची उपासना फलदायी ठरेल, अचानक धनलाभ होईल; ५ राशींच्या लोकाचं नशीब फळफळणार

Success Story: वडील वीट भट्टीवर कामाला; लेक २२ व्या वर्षी IPS झाला; सफीन हसन यांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT