Union Home Minister Amit Shah with Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis during a key meeting at Parliament House, Delhi. Saam Tv
Video

दिल्लीत देवेंद्र फडणवीस आणि अमित शाहांमध्ये चर्चा; २५ मिनिटांच्या चर्चेत काय घडलं? VIDEO

Maharashtra Political Scandal Latest Updates: दिल्लीच्या संसद भवनात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्त्वाची बैठक झाली.

Omkar Sonawane

दिल्ली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची संसद भवन येथे भेट घेतली आहे. या दोघांमध्ये 25 मिनिटे चर्चा झाली असून या भेटीत राजकीय खलबतं होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात हनी ट्रॅपचे प्रकरण जोरदार गाजत असल्यामुळे यामध्ये अनेक आजी, माजी मंत्री अडकले आहे. याबाबत देखील चर्चा झाली आहे. राज्यातील अनेक मंत्र्यांचे एकेक व्हिडिओ आणि भ्रष्टाचाराचे आरोप हे विरोधकांकडून केले जाताय.

यामुळे सरकार कुठेतरी अडचणीत आल्यामुळे यावर देखील अमित शाह यांनी काही सूचना केल्याची माहिती आहे. तसेच कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रम्मी खेळतानाचा व्हिडिओ बाहेर आल्यानंतर देखील सरकारच्या प्रतिमेला तडा गेला आहे. काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी मंत्री संजय शिरसाट यांचा पैशाची बॅग सोबत असलेला व्हिडिओ पोस्ट केला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. या सगळ्यामुळे राज्यातील जनता ही सरकारवर नाराज आहे. एकंदरीतच या सगळ्या विषयावर देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांची सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती विशेष सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT