Abhijeet Khandkekar and wife Sukhada with their eco-friendly Ganpati idol at Nashik home Saam Tv
Video

Abhijeet Khandkekar: अभिजीत खांडकेकरच्या नाशिकच्या घरी बाप्पा विराजमान|VIDEO

Abhijeet Khandkekar Eco-Friendly: मराठी अभिनेता अभिजीत खांडकेकरच्या नाशिकच्या घरीही गणपती बाप्पाचं आगमन झालंय. विशेष म्हणजे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अभिजीत दरवर्षी न चुकता नाशिकच्या घरी येतो.

Omkar Sonawane

अभिजीत खांडकेकर नाशिकमध्ये दरवर्षी गणपतीची प्रतिष्ठापना करतो.

यंदा पर्यावरणपूरक शाडू मातीची मूर्ती घरात विराजमान झाली.

सजावटीत कलेचा स्पर्श देऊन सुंदर आरास साकारली आहे.

चाहत्यांकडून खांडकेकर कुटुंबाच्या साध्या व पारंपरिक उत्सवाला मोठा प्रतिसाद मिळतो.

नाशिक: माझी नवऱ्याची बायको’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय मराठी अभिनेता अभिजीत खांडकेकर याच्या नाशिकच्या घरी यंदाही गणरायाचं आगमन झालं आहे. दरवर्षीप्रमाणेच अभिजीत खास गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नाशिकला हजेरी लावतो आणि आपल्या कुटुंबीयांसमवेत बाप्पाची प्रतिष्ठापना करतो.

यंदा त्याने पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून गणपती बाप्पाचं स्वागत केलं. विशेष म्हणजे अभिजीत व पत्नी सुखदा खांडकेकर यांनी यंदा बाप्पाच्या आरासीत कलेचा विशेष स्पर्श दिला असून कलेशी निगडीत सजावट घरच्या घरी साकारली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून खांडकेकर कुटुंब नाशिकमध्येच गणरायाचं स्वागत करत असून, त्यांच्या या पारंपरिक आणि साध्या उत्सवाला चाहत्यांकडूनही मोठा प्रतिसाद मिळतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tariff War: पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शनमोडवर! ट्रॅम्प यांच्या टॅरिफविरोधात आखला 'स्पेशल ४०'चा प्लॅन

Raj And Uddhav Thackeray Meets: तब्बल 20 वर्षांनी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर, ठाकरे बंधूंच्या भेटीचा राजकीय अर्थ काय?

Maharashtra Live News Update: पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर कारने घेतला पेट

Manoj Jarange Patil: हवं तर गोळ्या घाला’; जरांगे पाटील मुंबईकडे रवाना, सरकारवर आडकाठीचा आरोप

Apple Devices: IPhone 17 लॉंच होताच, बंद होणार अ‍ॅप्पलचे 'हे' डिव्हाईस

SCROLL FOR NEXT