नाशिक हादरलं! भाजपचा माजी नगरसेवक उद्धव निमसेकडून धोत्रे कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला, महिलांना जीवे मारण्याची धमकी|VIDEO

Nashik Ex-BJP Corporator Uddhav Nimse: नाशिक हादरलं! भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्यावर धोत्रे कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप. महिलांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत गुन्हा दाखल, सात जण अटकेत.
Summary

नाशिकमधील नांदूर नाका भागात भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचा कारनामा पुन्हा समोर.

धोत्रे कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला, महिलांना जीवे मारण्याची धमकी.

हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; पीडितांनी शिवसेना ठाकरे गटाची मदत मागितली.

पोलिसांत गुन्हा दाखल, सात जण अटकेत; उद्धव निमसे यांच्यावर अटकेची शक्यता.

नाशिक येथील नांदूर नाका भागातील भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्या कारनामीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. शहरातील नांदूर नाका भागातील धोत्रे कुटुंबियांवर माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्या कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केला आहे. या प्रसंगाचा व्हिडिओ उपस्थित काहींनी चित्रित केला असून तो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये भाजपचे नगरसेवक उद्धव निमसे यांचा सहभाग दिसत आहे. ज्या लोकांवर जीवघेणा हल्ला झाला त्यांनी आता शिवसेना ठाकरे गटाकडे धाव घेत मदतीसाठी दाद मागितली आहे.

यामध्ये धोत्रे कुटुंबीयांनी लहान मुलांसह महिलांवर देखील माजी नगरसेवक निमसे यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. तसेच निमसे यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही या महिलांनी सांगितले. पीडित धोत्रे कुटुंब शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख प्रथमेश गीते यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेत उद्धव निमसे यांना अटक करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सात जणांना अटक देखील केली आहे. हा हल्ला होत असताना निमसे तेथे उपस्थित होते हे देखील पोलीस तपासातून समोर आले आहे. यामुळे उद्धव निमसे यांच्यावर देखील अटकेची टांगती तलवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com