महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीची चुरशीची लढत पाहायला मिळायला. शनिवारी झालेल्या मतमोजणीमध्ये महायुतीने २८८ पैकी २३५ जागा जिंकून महाविकास आघाडीचा पराभव केला. मराठवाड्यातही महाविकास आगाडीचा मोठा पराभव झाला. मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघापैकी सात ठिकाणी महायुतीचा पराभव झाला होता. यावर आता खुद्द मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे फॅक्टर अपयशी ठरलेल्या लोकांवर त्यांनी टीका केली आहे.
कोणी श्रेय घ्यावं कोणी नाही घ्यावा. पण श्रेय घेताना लोकांनी आपली औकात बघितली पाहिजे. काल सगळे म्हणत होते जरांगे फॅक्टर फेल झाला आम्ही मैदानातच नाही तर कसं फेल झालो. कोणी निवडून आला काय आणि कोणी पडला काय आम्हाला सॉयर सुतुक नाही. आले तेवढे मराठा फॅक्टर मिळाले. जरांगे फॅक्टर कळायला हयात जाईल तुमची असे मनोज जरांगे म्हणाले.
मी राज्यात कुठे गेलो का, आलेले सरकार मराठ्यांच्या ताकदीवर आलेलं आहे. आम्ही मैदानात पाहिजे होतो तेव्हा दाखवला असता कचका आमच्या पॅर्टनचा. मराठा आरक्षण लवकर द्यायचं. बेमानी करायची नाही असा सरकारला पुन्हा इशारा देण्यात आला आहे. मी आणि माझा मराठा समाज मैदानात नव्हतो.आम्हाला आव्हान देणाऱ्यांना आम्ही किंमत देत नाही. सरकारचा शपथविधी झाल्यावर आम्ही समाजाची बैठक घेणार आहोत आणि आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत. सरकारने तातडीने मराठा आरक्षण द्यायचं नाही तर पुन्हा मराठे छाताडावर बसणार आहे असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
आमच्याशी बेमानी करायची नाही. तुमचं सरकार स्थापन झाले की बैठक घेऊन लगेच सामूहिक उपोषणाची तारीख जाहीर करणार. सरकार आलं त्याबद्दल त्यांना शुभेच्छा मोठ्या मनाने अभिनंदन देखील केल पाहिजे. आमचं समीकरण जुळलं नाही म्हणून आम्ही बाजूला राहिलो. कोणाचेही सत्ता आली तरी मला आणि समाजाला संघर्ष करावा लागणार आहे. कोणीही माजात आणि मस्तीत राहायचं नाही हुरळून जायचं नाही. मराठ्यांना छेडण्याचं काम करायचं नाही. मी निवडणुकित सांगितलं होतं मराठा समाज मालक आहे योग्य लोकं निवडा . मी मराठा मुक्त केला होता, मी कोणाच्याही दावणीला बांधला नव्हता असे ते म्हणाले असा दावाही त्यांनी केला आहे.
मराठ्यांशिवाय राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही. काल देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं की मराठा समाज भाजपसोबत होता. मराठ्यांची विभागणी होऊ शकत नाही . मीच मराठा समाजाला मुक्त केलं होत. मराठ्यांना जे योग्य वाटलं ते मराठ्यांनी केलं. मी मैदानात नव्हतो तर फॅक्टर फेल कसा झाला. एक महिनाभर थांबा ,तुम्हाला मराठ्यांची ताकद कळेल. या निवडणुकीत मराठ्यांचे 204 आमदार झाले. मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणीही सत्तेत येऊ शकत नाही. आम्ही मैदानात असतो तर मराठ्यांनी एक शिक्का काम केलं असत. पण आम्ही सांगितलं होत मराठा समाजाला जे करायचं ते करा. मी दोघांचेही अभिनंदन करतो निवडून येणाऱ्याचही आणि एक पडणाऱ्याचही मराठ्यांच्या फॅक्टरला बघूनच यांनी मराठ्यांना तिकीट दिले ना असे मनोज जरांगे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.