Devendra Fadnavis yandex
Tajya Batmya

Devendra Fadnavis: मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांचं नाव निश्चित? १३७ आमदारांचा पाठिंबा, दिल्लीत महत्त्वाची बैठक

Maharashtra Vidhansabha Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जनतेनं महायुतीला कौल देत भरघोस यश त्यांच्या पदरी पडलं. त्यानंतर आता राज्याच्या मुख्यमंत्रिपदाबाबत जोरदार चर्चा होतांना दिसत आहे.

Dhanshri Shintre

विधानसभा निवडणुकीचे निकाल आता हाती लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा पराभव स्विकारावा लागला. मात्र, विधानसभा निवडणुकीत पुन्हा नव्या जोमाने भाजप कामाला लागली. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपने नव्याने पक्ष उभारणीसाठी काम केलं. प्रचार केला, ग्राऊंड लेव्हलला काम केलं, लोकांपर्यंत पोहोचले, त्याचाच फळ त्यांना विधानसभा निवडणुकीत मिळताना दिसत आहे. नागपूर दक्षिण-पश्चिम येथून देवेंद्र फडणवीस यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजय झाला आहे. तर, भाजपने एकट्याने १३० जागांवर आघाडी घेतली आहे. हा विजय अत्यंत मोठा मानला जात आहे.

मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांचं नावं निश्चित? एकनाथ शिंदे, अजित पवार आणि अजित पवार यांच्यात आज संध्याकाळी दिल्लीमध्ये बैठक होणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला प्रचंड असं बहुमत मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आता मुख्यमंत्रीपदी आरएसएस आणि भाजपकडून हायकमांडची पसंती असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यानंतर अपक्षांचाही फडणवीसांना पाठिंबा आहे. भाजपाच्या पाठिंब्यामुळे चार सहयोगी पक्षतील आमदार निवडून आले. विधानसभेतील नवनिर्वाचित पाच आमदारांचा भाजपला पाठिंबा आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे, जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे आणि अशोकराव माने, युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा आणि अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांचा भाजपला पाठिंबा आहे. 5 आमदारांच्या पाठिंब्यामुळे भाजपची संख्या 137 वर पोहोचली आहे. महायुतीतील सर्वाधिक आमदारांची मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांना पसंती देण्यात आली आहे. भाजपनं आपल्या कोट्यातून ४ जागा मित्र पक्षांना सोडल्या होत्या, त्यापैकी ३ जागांवर विजय झाला असून तिन्ही आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला अनेक राज्यातून पाठिंबा मिळत असल्याचं दिसत आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी राज्यात मुख्यमंत्रीपदासाठी दाव्यांची फेरी सुरू झाली आहे. याबाबत सातत्याने भाषणबाजी, पोस्टर्स लावण्यात येत आहेत. या सगळ्यामध्ये महायुतीला बहुमत मिळाले तर मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न आहे. भाजप स्वतःचा मुख्यमंत्री करणार का आणि मग तो चेहरा कोण असेल? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले. मात्र, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आक्षेप नसल्याचं जाहीर केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivsena UBT : ठाकरे गटाचे प्रतोद, गटनेते आणि सभागृह नेते नियुक्त; भास्कर जाधव यांच्यावर मोठी जबाबदारी

IPL Mega Auction 2025 Live News: पंड्या RCB कडून खेळणार! लागली तब्बल इतक्या कोटींची बोली

Maharashtra Politics : निकालानंतर राजकारण ढवळून निघालं, बैठकांवर बैठका; CM पदासाठी रेस, मंत्रि‍पदासाठी लॉबिंग

Baby Care: लहान बाळ अचानक झोपेतून रडत उठतयं? वाचा कारण

Viral Video: जयगड बंदरावर माशांचा आला थवा, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT