Tagenarine Chanderpaul News : वेस्टइंडीज संघाचा अनुभवी फलंदाज शिवनारायण चंद्रपॉल हा गोलंदाजांना रडवण्यासाठी आणि टीच्चून फलंदाजी करण्यासाठी ओळखला जायचा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावे अनेक मोठ मोठ्या विक्रमांची नोंद आहे. काही वर्षांपूर्वी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केले असून आता त्याच्या मुलाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जोरदार एन्ट्री केली आहे.
सध्या वेस्टइंडिज संघाचे प्रतिनिधित्व करत असलेला तेगनारायण चंद्रपॉल देखील वेस्टइंडीज संघासाठी जोरदार कामगिरी करतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तेगनारायण आपल्या वडिलांपेक्षा एक पाऊल पुढे निघाला आहे. (Latest Marathi News)
सध्या वेस्टइंडिज (West Indies) आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात तेगनारायण चंद्रपॉलने तुफानी शतक झळकावले आहे. वेस्टइंडिज संघाने फलंदाजी करताना ८९ षटक अखेर एकही फलंदाज न गमावता २२१ धावा केल्या आहेत.
यादरम्यान तेगनारायण चंद्रपॉलने २९१ चेंडूंचा सामना करत १०१ धावांची खेळी केली आहे. या खेळी दरम्यान त्याने १० चौकार आणि १ षटकार मारला आहे. तसेच क्रेग ब्रेथवेटने देखील अप्रतिम फलंदाजी करत २४६ चेंडूंमध्ये ११६ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ७ चौकार मारले.
शिवनारायण चंद्रपॉल हा कसोटी क्रिकेटमधील (Cricket) दिग्गज खेळाडू आहे. वेस्टइंडिज संघासाठी त्याने १६४ कसोटी सामन्यांमध्ये ११८६७ धावा केल्या. ज्यामध्ये ३० शतकांचा समावेश आहे. मुख्य बाब म्हणजे आपले पहिले शतक पूर्ण करण्यासाठी शिवनारायण चंद्रपॉलला तब्बल ८ वर्षे आणि ५२ इनिंग वाट पाहावी लागली होती. तर त्याचा मुलगा तेगनारायणने हा पराक्रम केवळ पाचव्या इनिंगमध्ये करून दाखवला आहे.
क्रेग ब्रेथवेट आणि तेगनारायण चंद्रपॉल या दोघांनी केलेली खेळी वेस्टइंडिज संघासाठी अतिशय महत्वाची ठरली. सुरुवातीला ब्रेथवेटने शतक पूर्ण केले. यासह तो १० वर्षांनंतर वेस्टइंडिज संघासाठी शतक झळकावणारा सलामीवीर फलंदाज ठरला. तसेच तेगनारायणने शतक झळकावत आपल्याच वडिलांना मागे सोडलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.