VIDEO : 'खतरनाक' अष्टपैलू खेळाडूची टीम इंडियात कडक एन्ट्री! 'तो' कठीण काळ अन्...

Ravindra Jadeja New Video : भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा पुन्हा संघात आलाय.
Ravindra Jadeja Practice Video
Ravindra Jadeja Practice VideoBCCI/Twitter
Published On

Ravindra Jadeja Video : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा संघात पुन्हा परतला आहे. जवळपास पाच महिन्यांनंतर दुखापतीतून सावरला आहे. आता तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात खेळण्यास कमालीचा उत्सुक आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या होणाऱ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी भारतीय संघात त्याला स्थान देण्यात आलं आहे. पुन्हा भारतीय संघाची जर्सी घालणं माझ्यासाठी खूपच मोठी गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया रविंद्र जडेजानं दिली आहे.

Ravindra Jadeja Practice Video
MCA : राज्यातील क्रिकेटपटूंसाठी 'एमसीए' चे अध्यक्ष Rohit Pawar यांनी दिली आनंदाची बातमी, म्हणाले...

रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) दुखापतीमुळं गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या टी २० वर्ल्डकप स्पर्धेत खेळू शकला नव्हता. आता तो पुन्हा भारतीय संघात परतला आहे. (Cricket News)

Ravindra Jadeja Practice Video
India Vs Pakistan Cricket World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषकातून पाकिस्तानचा संघ माघार घेणार? काय आहे कारण?

'संघात (Team India) पुनरागमन करत असल्यानं खूपच खूश आणि उत्सुक आहे. मला पुन्हा भारतीय संघाची जर्सी घालण्याची संधी मिळाली. माझ्या इथपर्यंतच्या प्रवासात खूपच चढ-उतार आले. कारण जवळपास पाच महिने तुम्ही क्रिकेट खेळत नाहीत तेव्हा खूप नैराश्य येते. मी लवकरात लवकर तंदुरुस्त होण्याची वाट बघत होतो. कारण मला भारतासाठी खेळायचं आहे, अशी प्रतिक्रिया जडेजानं दिली. (Sports News)

माझ्यासाठी वर्ल्डकपच्या आधी किंवा नंतर शस्त्रक्रिया करून घेण्याचा निर्णय घेणं कठीण झालं होतं. अखेर डॉक्टरांच्या सल्ल्यानं मी निर्णय घेतला. शस्त्रक्रियेच्या दरम्यानचा काळ खूपच कठीण होता. पण टीम इंडियाची जर्सी घालायची होती आणि हा कठीण काळही सरला, असंही रविंद्र जडेजानं सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com