नवी दिल्ली : क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी हाती आली आहे. आशिया क्रिकेट परिषदेच्या बैठकीनंतर स्पष्ट झाले आहे की, टीम इंडिया आशिया कप २०२३ खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा करणार नाही. यानंतर पाकिस्तानचा संघ एकदिवसीय विश्वचषकातून माघार घेण्याचा विचार करत आहे. (Latest Marathi News)
मीडिया रिपोर्टनुसार, बीसीसीआयकडून आशिया चषक स्पर्धेसाठी टीम इंडिया (Team India) पाकिस्तानचा दौरा करणार नाही. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नाराज झालं आहे. तर दुसरीकडे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की, आशिया चषक स्पर्धा पाकिस्तान (Pakistan) व्यतिरिक्त अन्य जागेवर खेळवण्यात येत असेल,तर टीम इंडिया स्पर्धेत सहभागी होईल.
भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, भारतीय खेळाडू पाकिस्तानात जाणार नाही . विराट कोहली, रोहित शर्मा आणि शुभमन गिल सारखे खेळाडू स्पर्धेत नसतील, तर चषकाचे स्पॉन्सर देखील माघार घेऊ शकतात.
दरम्यान, एका मीडिया रिपोर्टनुसार, आशिया चषक २०२३ स्पर्धा पाकिस्तान व्यतिरिक्त अन्य ठिकाणी खेळवण्यात येत असेल, तर पाकिस्तान एकदिवसीय विश्वचषकातून माघार घेण्याच्या तयारीत आहे. तर भारताच्या विरोधामुळे आशिया चषक स्पर्धा यूएई येथे खेळवण्याची तयारी सुरू आहे, अशीही चर्चा आहे.
दरम्यान, बीबीसीआय सचिव जय शाह यांनी आशिया क्रिकेट परिषदेत स्पष्ट केले आहे की, भारतीय खेळाडू पाकिस्तानचा दौरा करणार नाही. बीसीसीआय खेळाडूंच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.